Monday, February 14, 2011

"तुझा चेहरा"chuti

प्राजक्ताचं झाड कसं,
फुलांनी झाकलंय...
तुझा चेहरा पाहाण्या साठी,
थोडसं खाली वाकलंय...

अबोलीची फुलं कशी,
छान डवरलीत...
तुझा चेहरा पाहुन,
तिही थोडी बावरलीत...

जास्वंदाचं फुल अगदी,
बेहाल झालंय...
तुझा चेहरा पाहुन ते,
अधिक लाल झालंय...

हासत नाचत आल्या,
जुई आणि जाई...
तुझा चेहरा पाहुन,
म्हणाल्या "अग्गं बाई"...

झेंडुचं फुल गेलंय,
पार कोमेजुन...
ह्या चेहर्‍यापुढे निभावणार नाही,
गेलंय ते समजुन...

गुलाबाच्या फुलाची,
बातच न्यारी...
तुझा चेहरा पाहुन,
काळवंडलीय स्वारी...

तुझा चेहरा पाहाण्यासाठी,
मोगरा सरकला...
तुझा मुखडा पाहुन,
तोही भान हरखला...

अशा या बागेतली सर्व फुले,
म्हणती आपापसांत काही...
"देवा"ने या बाईला,
किती सुंदर "चेहरा" दिलाय नाही...

"देवा"ने या बाईला,
किती सुंदर "चेहरा" दिलाय नाही

             


नंदू

No comments:

Post a Comment