Monday, February 14, 2011

वही अन पेन

वही अन पेनाची,
नजरा नजर झाली,
शब्दां संगे दोघांची,
अनोखी प्रित बहरली...

वही थोडी लाजली,
अन हळुच हुंकारली,
शब्दांनीच पेनाची,
प्रित साकारली....

वहीच्या पांढर्‍या शुभ्र,
नाजुक ह्रदयावर,
तीन शब्द उमटले,
निळ्याशार रक्ताने,
पेनाने I LOVE U म्हटले....

लाजेने चुर झालेली वही,
दिसु लागली अधिकच देखणी,
पेन ही आले खुपच फॉर्मात,
छान बोलु लागली त्याची लेखणी....

इकडे पेनाला एक वेगळीच ,
चिंता खात होती,
खोडरबराची त्याला खुप,,
भिती वाटत होती.....

रबराने ही दिला,
त्या दोघांना दुजोरा,
म्हणाला,माझा पाठींबा,
आहे तुमच्या मिलनाला....

कव्हराने वहीला साक्ष दिली,
पेनाला टोपणाची साक्ष मिळाली,
अन दोहोंच्या ही मधुर मिलनाची,
रात्र साजरी झाली.......

अशी ही वही अन पेनाच्या,
अजब प्रेमाची,गजब कहाणी,
साठा उत्तरा सफल,संपुर्ण झाली,
अन आमच्या चिंटुला,
"सुलेखना"चं बक्षिस मिळवुन गेली.....

         नंदू

No comments:

Post a Comment