Monday, February 14, 2011

"बाकी काही नाही"

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन,
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन...
कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही,
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही...

जेवता जेवता जिवघेणा लागेलही ठसका,
घरचे म्हणतील...
कसा लागतो उठता बसता सारखा सारखा...
चेहरा लपवत,डोळे पुसत पाणी प्यावे थोडे,
बोलण्या आधी आवाजाला सांभळावे थोडे...
सांगुन द्यावं...
काळजी करण्या सारखं बिलकुल काही नाही,
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही...

जेवल्या नंतर चेहर्‍यावरचे ओघळही सुकले,
अंगणातले पारीजातकही
कारण विचारण्या थोडेसे वाकले.......
आवंढा गिळत,हलकेच हासत,
कातर आवाजाने मन मोकळे केले,
आणि म्हटले...
कोमजण्या सारखं बिलकुल काही नाही,
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही...

No comments:

Post a Comment