Wednesday, February 23, 2011

असे का होतेय...?

तु समोर आलास की,
हे असे का होतेय.....?

अंग माझे का शहारतेय,
मन माझे का मोहरतेय,
नववधु प्रिये गत,
मी का बावरतेय.......??

तु समोर असलास की,
हे असे का होतेय.......?

ह्रदय माझे का धडधडतेय,
अंग माझे का थरथरतेय,
घाबरलेल्या हरीणी गत,
मी का लपु पाहतेय........??

तु जवळ असलास की,
हे असे का होतेय........?

डोळ्याची कड का ओलावतेय,
ओठांवरले पाणी का सुकतेय,
तारुण्य सुलभ भावनेने,
मन का उंडारु पाहतेय........??

तु गोड हसलास की,
हे असे का होतेय......?

पणतीतली लहानगी वात,
का भडकु पाहतेय,
शांत सागरातले तारु,
का भरकटु पाहतेय,
बेभान वार्‍यावरती मन माझे,
का स्वार होऊ पाहतेय..........??

तु दूर गेल्या वरती,
हे असे का होतेय.......?

चित्त माझे,
का विचलीत होतेय,
डोळ्यांतले पाणी,
का गालावर ओघळतेय,
प्रित हरवलेल्या विरहनी गत,
पाउल का मागे वळु पाहतेय.......??
पाउल का मागे वळु पाहतेय........???

नंदू

No comments:

Post a Comment