Sunday, February 13, 2011

अरेच्या,विसरुनच गेलो.....

इतक्या प्रश्नांचं ओझं घेउन,
मी एकटाच बसलो होतो,
अरेच्या,विसरुनच गेलो,
मी ही कधी हसलो होतो......

वाळुवरती स्वप्नांचा,
बंगला बांधत होतो,
एकेक गत आठवणींचा,
सांधा सांधत होतो.......

वाळुवरचे तुझ्या पावलांचे,
ठसे अस्पष्ट होत होते,
माझ्या मनातले तुझे घाव,
मात्र, सुस्पष्ट भासत होते.....

काय झालं होतं असं,
का मजवर रुसलीस अशी,
रुसायचंच होतं असं,तर,
खेळलीस का माझ्या आयुष्याशी.....

एक एक आठवण तुझी,
उलगडत जात होती ऊरी,
खपली निघतंच होती अविरत,
आठवणींची जखम चिघळणारी....

तुझ्या आठवणीं सोबत येणारे,
माझ्या मनीचे मोर पिसारे,
का घेउन गेलीस ते संग सारे,
आता उरले फक्त,
काळजातले जळते निखारे.....

आता उरात साठवुन ते सारं,
गत स्मृतिंचा हिशेब करत,
बेधुंद गाज ऐकत सागराची,
एकटक पाहात बसलो होतो.....

अरेच्या,विसरुनच गेलो,
मी ही कधी तुझ्यावर रुसलो होतो,
हे आठवुन ही मनातल्या मनात,
एकटाच विषण्ण हसलो होतो.........

        नंदू

No comments:

Post a Comment