Wednesday, February 16, 2011

"वेंधळा"

भाव तुझ्या डोळ्यांमधले,
सांगत होते मजला काही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

मला आपलंसं करण्याच्या,
तुझ्या क्लुप्त्या सांगुन जात,
होत्या बरंच काही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

तुझ्या केसातल्या मोगर्‍याचा दरवळ,
माझ्या भोवताली घुटमळत राही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

तुझं ते अवचित येणं,
तिरप्या नजरेने खुणावणं,
जशी अवचित येणार्‍या पावसानं,
धरणी मोहरुन जाई,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

चांदण्या रातीचा तुझा तो सहवास,
तुझ्या साडीवर फवारलेल्या,
अत्तराचा सुवास,
भारलेला आसमंत कसा,
बेधुंद होऊ पाही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

कळत नकळत एक फुल,
भ्रमराच्या प्रितित,
गुंतुन राहु पाही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

नंदू

No comments:

Post a Comment