Wednesday, February 23, 2011

"कळत नकळत"

कसे कळत नकळत,
तुझ्यात गुंतत गेलो,
जशी प्रितीची माळ,
तुझ्या केसांत गुंफत गेलो....

तुझ्याही नकळत तुझे,
भाव विभोर डोळे,
साद देत होते प्रितीची,
माझ्याही नकळत त्यात,
बेधुंद वहावत गेलो......

तुझ्या हातांचा हार,
जेव्हा पडला,
माझ्या गळ्याभोवती,
माझ्याही नकळत,
तुझ्या बाहुपाशात,
बेहोश होत गेलो.......

तुझी कटीकमर जेव्हा हाले,
जशी हरीणाची चपलता,
त्या डौलदार चाली मागे,
माझ्याही नकळत,
मदमस्त होत गेलो.......

चांदण्या रात्रीत चंद्राच्या साक्षीने,
हात हातात गुंफत गेलो,
उधानलेल्या सागराच्या कुशीत,
धरणी सारखे विरघळत गेलो......

कळली परीभाषा प्रेमाची जेव्हा,
तेव्हा कळत नकळत का होईना,
प्रितीच्या हाकेला हाक देत,
एकमेकांच्यात अलगद सामावुन गेलो.....


नंदू

No comments:

Post a Comment