Monday, February 14, 2011

"पाखरु"...

एक पाखरु उडालं,
दोरीवर जाउन बसलं...
मला उडता येत नाही हे पाहुन,
गाली खुदकन हसलं...

अन म्हणालं,
कपडे वाळायच्या दोरीवर,
मला बसता येतं...
मी ही त्याला म्हणालो,
तुझ्या या अवखळ पणावर,
मलाही हसता येतं...

तसं ते,
पटकन लाजलं,
डोळ्याच्या कोनात हासलं,
अन पटकन उडालं...
माझं मन मात्र,
त्याच्या आठवणीत,
आकंठ बुडालं...

पण ते पाखरु,
कुठे दिसेना,
दोरीवर बसेना....
माझं मनही,
त्याला पाहील्या शिवाय,
स्वस्थ काही बसेना....

त्याची आठवण मला,
अशीच छळत राहाते...
उरीची जखम माझी,
उरातच भळभळत राहाते...

           








नंदू

No comments:

Post a Comment