Monday, February 14, 2011

"ती"

मी माझ्याच विश्वात रमलो होतो,
ती कधी आयुष्यात आली,
कळलंच नाही...
काळ्या भोर डोळ्यांनी,
कधी आपलसं करुन गेली,
कळलंच नाही...

तिचे मानेवर रुळणारे,
लांबसडक केस,
कधी मनाला मोहवुन गेले,
कळलंच नाही...
गोबर्‍या गालावरच्या त्या,
नाजुक खळ्या,
ह्रदयाला कधी स्पर्शुन गेल्या,
कळलंच नाही....

लाल चुटुक ओठांवरचं ते,
गुलाबी हासु,
माझ्या दिलाची तार,
कधी छेडुन गेलं,
कळलंच नाही....
बेभान करणारं तिचं ते,
मादक सौंदर्य,
अंग अंगी माझ्या कधी,
रोमांच फुलवुन गेलं,
कळलंच नाही....

तिचे काळेभोर डोळे,
मला सारखे खुणावत होते,
मला भेटायला बोलावत होते,
कसं भेटावं,कधी भेटावं,
कळत नव्हतं काही मला.....
तिला भेटायची हुरहुर मात्र,
कळत होती माझी मला......

तिच्या मिठीत समावताना,
चंद्र ही चोरुन बघत होता,
कसा तो,कळलंच नाही.....
स्वप्नातुन जागा होताना,
कावरा बावरा झालो होतो,
कसं ते माझं मला,
कळलंच नाही......

ती मात्र मला अजुनही खुणावते,
स्वप्नात येउन अहोरात्र सतावते,
माझ्याही नकळत मी गुंतलोय,
का तिच्यात.....?
विचारत होतो मनाला,पण,
पुन्हा कधी डोळा लागला,
कळलंच नाही.......

No comments:

Post a Comment