Monday, February 14, 2011

"तो" अन "ती"

ती म्हणाली....
चंद्र बघ कसा,
झाडा आडुन लाजतोय....
तो म्हणाला....
तो चांदणीच्या,
प्रेमवर्षावात आकंठ भिजतोय....

ती म्हणाली....
चल,असं कधी होतंय..?
चंद्राचं प्रेम चांदणीला कधी मिळतंय..?
तो म्हणाला....
अगं वेडे, चंदणीला पाहुन,
चंद्राचं काळीज कधी वितळतंय..?

ती म्हणाली....
चंद्र अन तु,
दोघे ही निर्दयी....
तो म्हणाला....
हाय, तु अन चांदणी,
कायमचे माझ्या ह्रदयी....

ती म्हणाली....
चल चावट कुठला,
असंच गोड बोलुन मला पाघळवतो....
तो म्हणाला....
प्रिये,एकदा मिठीत तर ये,
मग बघ कसं तुला विरघळवतो....

ती म्हणाली....
आ,हाहा, विरघळायला,
मी काही साखर नाही....
तो म्हणाला....
तुझ्या साखरेची चव,
काही केल्या जात नाही....

ती म्हणाली....
चावटपणा पुरे,
मला "अंगार" म्हणतात....
तोही हसला न म्हणाला....
अगं माझे राणी,
यालाच तर "शृंगार" म्हणतात.....

   









नंदू

1 comment:

  1. वा खूपच सुंदर साखर विर्घवलीत शृंगारात !!!!

    ReplyDelete