Sunday, February 13, 2011

"निशःब्द आजवर"

दररोज ठरवुनही,
मनातल्या काही,
गोष्टी बोलताच,
आल्या नाहीत आजवर....


तुही तशी निशःब्दच,
मी हा असा अबोल,
पण बोलक्या डोळ्यांनी,
घाव केला कुठेतरी खोलवर.....

सांगेन कधी तरी,
असं वाटायचं रोज,पण,
मुक भावनांना माझ्या,
फुटला होता गहीवर......

मला कळत होते,
तुझ्या लोचनीचे भाव,पण,
माझ्याही नकळत ह्रदय,
धडधडले होते क्षणभर.......

चांदण्या रात्रीतलं ते,
तुझं माझ्या सोबत असणं,
ओठांचा चंबु करुन,
हलकेच गोड हासणं,
न बोलताही डोळ्यांनी,
सारं काही वाचलं होतं रात्रभर....

निशःब्दतेच्या बागेत,
भावनांना येई दरवळ,
तुझ्या श्वासातली उष्णता,
माझ्या श्वासांना जाणवली कणभर.....

आज जरी असलो,
दोघे वेगळे आपण,
तरी प्रितिचा मृदगंध,
पसरत राहीला दूरवर.......

म्हणुनच आज तुला,
मोकळे पणाने बोलायचं,
असं ठरवलं........

पण आजही बोलताच,
येणार नाहीय.......
तुझ्या तसबिरीकडे पहात,
तुझ्या गहीर्‍या आठवणींनी,
अश्रु साठले डोळाभर.........

    


  नंदू

2 comments: