Monday, February 14, 2011

"अंगण"....

मुल जसं घर सगळं
भरुन टाकतं,
झाड तसंच अंगण सगळं
भारुन टाकतं.....
पाखरांना मायेने गळा लावतं,
वार्‍याला हिरवागार लळा लावतं.........
ऋतुंचं येणं होतं... जाणं होतं,
सगळं अंगण झाडासाठी गाणं होतं......
त्या अंगणात चाललेला
तो सुरपारंब्यांचा खेळ,
दुपारच्या क्षणी झाडाखाली
घालवलेला तो निवांत वेळ......
अंगण सकाळी पारिजातकाने
भरुन जातं,
तो फुलांचा सडा पहात
झाड कौतुकाने भारुन जातं.....
चिमुकल्यांना झाडाचा
आधार होतो,
थोरांचा अंगणात
राबता असतो......
ऋतुंचं येणं होतं... जाणं होतं,
सगळं अंगण झाडासाठी गाणं होतं...

No comments:

Post a Comment