Monday, February 14, 2011

भग्न विराणी

तुझ्या आठवनीचा वडवानल,
माझ्या मनी शमता शमेना,
तुझ्या आठवणीं शिवाय,
हे मन माझे रमता रमेना.....

खुप व्याकुळ होऊन बसतो,
जेव्हा एकलकोंडा मी,
तुझ्या आठवणीं वरचा,
हिमनग जमता जमेना.....

बेधुंद वार्‍यात जेव्हा,
धावतो सैरवैर मी,
तुझ्या आठवणींची,
बेभान ज्योत निमता निमेना.....

शल्य उरी तुझ्या आठवणींचे,
घेउन जन्मभर फिरणे आले,
चिघळलेली जखम ह्रदयाची,
काही थांबता थांबेना.......

आता एकांतात ही तुझ्या,
आठवणींचीच सोबत असते,
आयुष्याची ही आर्त विराणी,
या भग्न ह्रदयी विरता विरेना.....

          
नंदू

No comments:

Post a Comment