Monday, February 14, 2011

2 "जी".....

बेदरकार वाढलेल्या "अशोका"ने,
एकदा विचारले दक्षिणी "राजा"ला,
"आदर्श" मी कोणाचा ठेवु,
सांगा जरा तुम्ही मजला.....

राजा चरकला,फ्रस्ट्रेड झाला,
म्हणाला वेड्या,तुला काय सांगु,
2 जीचा घोटाळा सावरताना,
मीच होऊन गेलोय पंगु........

त्यापेक्षा तु जाऊन विचार,
त्या कलमा(डी)च्या सुरेशाला,
CWG च्या नावा खाली त्याने,
विकायला काढलंय देशाला.......

सुरेशाने फिरवली त्याकडे पाठ,
कारण त्याचीच छाटली गेलीय,
दिल्लीची वाट,
तो म्हणाला विलासात लोळणार्‍या,
त्या लातुरकरा कडे जा,
तोच दाखवेल तुम्हाला वाट.....

लातुर आणि नांदेड मधुन,
विस्तवही जात नाही,
म्हणुनच पृथ्वीराज येऊन,
बसले डोकीवर आमच्याही,

CWG,लवासा,जैतापुर......
घोटाळ्यांनाही आलाय महापुर,
सावकारांना पाठीशी घालुन,
चिडी चुप्प बसलंय बघा लातुर.....

अरे रे रे.....
निराश होऊन झाड अशोकाचं,
असं काही बिथरलं,
नांदेडच्या बागेत जाऊन,
निवांत पणे पसरलं........

झाड अशोकाचं विचार करु लागलं,
स्वतःशीच हसुन म्हणालं,
आता आदर्श बाळगायचा तो,
2 जींचा........
एक राहुल"जी"
दुसर्‍या सोनिया"जी"......

   


नंदू

No comments:

Post a Comment