Saturday, February 26, 2011

"मला मात्र नेहमी"

आयुष्याच्या काही वळणांवरती,
काही मोक्याची,काही धोख्याची,
वळणे आली....
पण मला मात्र नेहमी,
आडवळणाची वाट भावली......

काही मळलेल्या वाटे वरुन,
काही अनोळखी पावले धावली,
पण मला मात्र नेहमी,
ओळखीचीच पावले भावली......

काही अनोळखी वाटे वरुन,
दिसली काही अननुभवी,
पावलांची अशांत सावली,
पण मला मात्र नेहमी,
अनुभवी सावलीच भावली.....

काही अनवट वाटे वरुन,
खळाळती सरीता धावली,
पण मला मात्र नेहमी,
सागराची शांत गाज भावली.....

काही अंधार्‍या वाटे वरुन,
काजव्यांची लुकलुकती,
पावले हेलकावली,
पण मला मात्र नेहमी,
चमचमत्या तार्‍य़ांचीच,
सोबत भावली....

काही घनदाट पायवाटे वरुन,
काही खुरटी झुडुपे धावली,
पण मला मात्र नेहमी,
भावली डेरेदार वृक्षाचीच सावली......

आयुष्य असंच अनेक,
वळणा वळणांनी धावणारं,
काट्याकुट्यांच्या वाटेवरुन पळणारं,
कुणास ठाऊक,
किती वर्ष त्यावरुन सरली,
म्हणुनच मी मात्र नेहमी,
आडवळणाचीच वाट धरली.......

नंदू

Friday, February 25, 2011

सहजच.....

काळोखातुन प्रकाश अंश,
क्षितिजापार धावत असतो,
त्याच प्रकाशातुन मंद वारा,
वेड्यासारखा वहावत असतो...

सहजच.....

तु फितुर,तुझे शब्द फितुर,
मी आतुर,माझी प्रित आतुर,
मनीची तार झणकारताना,
मंद स्वरांनी सजते संतुर.......

सहजच.....

तुझ्या फितुर झालेल्या शब्दांना,
माझ्या कडे वळवावेसे वाटते,
पण मन तुझ्यापाशीच घुटमळतेय,
हे मनानेच कळवावेसे वाटते.......

सहजच.....

निरोपाचा हात हलवताना,
मनी हुंदका का दाटला,
"परत भेटु" असं म्हणताना,
स्वर माझा का आटला.......

सहजच.....

त्या वास्तुतले ते झुंबर,
आता जरी असले ओशाळवाणे,
पण कधीतरी ते ही होते,
दिमाखदार अन देखणे.......

"कलश रीता"

तो शांत महासागर,
ती अवखळ सरीता,
तो महायोगी वटवृक्ष,
ती लाजरी बुजरी लता.....

तो कृष्ण सखा गोपालांचा,
ती राधे सम कांता,
तो आदर्श श्री रामाचा,
ती कारुण्यमयी सिता.....

तो सावली हिमालयाची,
ती हिमशिखरांची गाथा,
तो पाया भक्कम मंदिराचा,
ती उंच कळस माथा.....

तो अभंग तुकयाचे,
ती ज्ञानोबाची गीता,
तो अविचल महामेरु,
ती अल्लड चंचल स्मिता.....

त्या दोहोंच्या प्रितिची ही,
अनोखी प्रेम कथा,
ती प्रेमातुर गौरांगीणी,
तो प्रेम अर्पिणारा कलश रीता..........










नंदू

Thursday, February 24, 2011

सहजच.....

गाली चढलेल्या लालीने,
बेभान मजला आज केले,
त्याच बेभान पणे मी,
तुझे ह्र्दय काबिज केले......

सहजच.....

जेव्हा नयन तुझे,
अधोमुख झुकले होते,
आनंदाचे अश्रु तुझ्या,
गालावर सुकले होते.....

सहजच.....

तुझ्या मुखकमला वर,
भान माझे हरले होते,
तेव्हा तुझ्या लोचनांनी,
माझे मलाच भारले होते.....

सहजच.....

रात्री तुझ्या डोळ्यांत पाहताना,
आकाशीचा चंद्र जणु हासत होता,
जरा जवळ जाउन पाहीलं,
तर तुझ्या ऐवजी,
चंद्रच लाजताना दिसत होता......

सहजच.....

मन जरी कोरे असले तरी,
होते डोळे माझे भरलेले,
भान विसरुनी शोधित होते,
तुज सोबतचे दिन सरलेले......

Wednesday, February 23, 2011

सहजच.....

नात्यात जिव्हाळ्याची,
घट्ट विण असावी,
त्यात कुठली ही,
भावना हीन नसावी......

असे का होतेय...?

तु समोर आलास की,
हे असे का होतेय.....?

अंग माझे का शहारतेय,
मन माझे का मोहरतेय,
नववधु प्रिये गत,
मी का बावरतेय.......??

तु समोर असलास की,
हे असे का होतेय.......?

ह्रदय माझे का धडधडतेय,
अंग माझे का थरथरतेय,
घाबरलेल्या हरीणी गत,
मी का लपु पाहतेय........??

तु जवळ असलास की,
हे असे का होतेय........?

डोळ्याची कड का ओलावतेय,
ओठांवरले पाणी का सुकतेय,
तारुण्य सुलभ भावनेने,
मन का उंडारु पाहतेय........??

तु गोड हसलास की,
हे असे का होतेय......?

पणतीतली लहानगी वात,
का भडकु पाहतेय,
शांत सागरातले तारु,
का भरकटु पाहतेय,
बेभान वार्‍यावरती मन माझे,
का स्वार होऊ पाहतेय..........??

तु दूर गेल्या वरती,
हे असे का होतेय.......?

चित्त माझे,
का विचलीत होतेय,
डोळ्यांतले पाणी,
का गालावर ओघळतेय,
प्रित हरवलेल्या विरहनी गत,
पाउल का मागे वळु पाहतेय.......??
पाउल का मागे वळु पाहतेय........???

नंदू

सहजच.....

नात्यात दोहोंच्याही,
प्रेमाचा मेळ असावा,
त्यात कुणाच्या ही,
भावनेशी खेळ नसावा......

"कळत नकळत"

कसे कळत नकळत,
तुझ्यात गुंतत गेलो,
जशी प्रितीची माळ,
तुझ्या केसांत गुंफत गेलो....

तुझ्याही नकळत तुझे,
भाव विभोर डोळे,
साद देत होते प्रितीची,
माझ्याही नकळत त्यात,
बेधुंद वहावत गेलो......

तुझ्या हातांचा हार,
जेव्हा पडला,
माझ्या गळ्याभोवती,
माझ्याही नकळत,
तुझ्या बाहुपाशात,
बेहोश होत गेलो.......

तुझी कटीकमर जेव्हा हाले,
जशी हरीणाची चपलता,
त्या डौलदार चाली मागे,
माझ्याही नकळत,
मदमस्त होत गेलो.......

चांदण्या रात्रीत चंद्राच्या साक्षीने,
हात हातात गुंफत गेलो,
उधानलेल्या सागराच्या कुशीत,
धरणी सारखे विरघळत गेलो......

कळली परीभाषा प्रेमाची जेव्हा,
तेव्हा कळत नकळत का होईना,
प्रितीच्या हाकेला हाक देत,
एकमेकांच्यात अलगद सामावुन गेलो.....










नंदू

सहजच.....

नात्यात दोहोंच्या ही,
प्रेमाचा मेळ असतो,
त्यात कुणाच्या ही,
भावनांशी खेळ नसतो....

Saturday, February 19, 2011

"मालुम है मुझे"

मेरा हर पल हर लम्हा,
तेरे चरणों में बहाना चाहता हुँ,
ऐ भारत माँ,
मै तेरे शरण में आना चाहता हुँ......

हाँ तुझे परकियोंने घेरा है,
मालुम है मुझे...
लेकिन अपनोंने भी तो जमाया,
हुआ यहाँ डेरा है,
मालुम है मुझे...
घातक वो नही जो बाहरी,
हमलावर है,
घातक वो है जिन्होंने,
मिठे खंजर से तुझे मारा है,
मालुम है मुझे.....

अंग्रेजों से लडकर आझादी,
हासील हुई थी,
तेरा सर फक्र से उंचा हुआ था,
आज इनकी काली करतुतों से,
तेरी आंखे शर्म से झुक गयी है,
मालुम है मुझे.....

तुझे बेबस करनेवाले कोई,
और नही, तेरे ही सपूत है,
मालुम है मुझे....
तेरा सारा धन बाहर के मुल्कों में,
बाट्नेवाले, तेरे ही सपूत है,
मालुम है मुझे......

आज फिर से द्रौपदी का,
शील हरण होने जा रहा है,
तब लाज रखने कृष्ण सखा था,
आज वो भी द्वारका में नही है,
मालुम है मुझे......

मगर एक दिन ऐसा भी आयेगा,
सोया हुआ इन्सान जाग जायेगा,
तब तेरी आंखे भी नम हो जायेगी,
तभी सही मायनो में,"लोकशाही"आयेगी,
मालुम है मुझे.....
मालुम है मुझे.....
मालुम है मुझे.....












 नंदू

Friday, February 18, 2011

सहजच.....

चांदण्यात फिरण्याची,
काही औरच मजा आहे,
राणी आहे चांदणी,
अन,चंद्र राजा आहे.....

सहजच.....

तु ही अबोल होतीस,
माझेही शब्द संपले होते,
पण,डोळ्यांत दोघांच्याही,
काही अर्थ लपले होते........

सहजच.....

संसार म्हणजे खेळ नसतो,
दोन जीवांचा मेळ असतो,
कधी कधी गैरसमजा मुळे,
मात्र,त्याचा पोरखेळ होऊन बसतो.....

वहा तु नही....

मैने जब भी तेरे आखोमें,
गेहराई देखनी चाही,
वहा तु नही,
नदी की चंचलता नजर आई....

मैने जब भी तेरी,
झुल्फें उलझनी चाही,
वहा तु नही,
आसमाँ से काली घटा घिर आई....

मैने जब भी तेरे,
गालों को सेहलाना चाहा,
वहा तु नही,
सुबह की आभा फैलती नजर आई....

मैने जब भी तेरे,
ओंठों को छुना चाहा,
वहा तु नही,
चाँद की शितलता महसुस हुई....

मैने जब भी तेरी,
कमर परखनी चही,
वहा तु नही,
सागर की लेहेर लेहराई....

मैने जब भी तेरे,
कदम देखने चाहे,
वहा तु नही,
हिरन की चपलता नजर आई....

मैने जब भी तुम्हे,
अपनी बाहो में भरना चाहा,
वहा तु नही,
तेरी परछाई नजर आई....

मैने जब भी उस,
परछाई को पकडना चाहा,
वो हमेशा मुझसे मुस्कराते,
आंख मिचौली खेलते नजर आई......

वो हमेशा मुझसे मुस्कराते,
आंख मिचौली खेलते नजर आई......

नंदू

Thursday, February 17, 2011

"तिथे ही अन इथे ही"

कडाडुन वीज कोसळलीय,
तिथे ही अन इथे ही,
तिथे फक्त झाड कोसळलंय,
इथे कोसळलोय मीही अन तीही.....

सोसाट्याचं वादळ आलंय,
तिथे ही अन इथे ही,
उन्मळले मोठाले वृक्ष तिथे,
इथे उन्मळली,
दवबिंदुसह तृणपातही.......

जोराचा वणवा पेटलाय,
तिथे ही अन इथे ही,
चिंगारीचं रुप घेतलंय,
विझु लागलेल्या पणतीनंही......

झंजावात सुरु झालाय,
तिथे ही अन इथे ही,
अंगावर येऊ पहातेय,
शांत परतणारी लाटही......

घोंगावणारा वारा साद देतोय,
तिथे ही अन इथे ही,
तुतारीसम भासे आज,
शांत सागराची गाज ही........

धडधडणारी ह्रदये असतात,
तिथे ही अन इथे ही,
प्रितिची चाहुल लागते,
हळुवार ह्रदय स्पंदनातही,
तिथे ही अन इथे ही......









नंदू

Wednesday, February 16, 2011

सहजच......

जाणीव होताच तुझ्या,
संवेदनशील मनाची,
मी ही बाजुस सारली,
लाज थोडी जनाची......

सहजच......

तुझ्या भावुक डोळ्यांची कड रडते,
त्याला सागराचा ओलावा असतो,
त्यात मनसोक्त डुंबण्यासाठी मात्र,
तुझा चेहरा खुलावा लागतो.......

सहजच......

घनशामाच्या सावळ्या रुपावर,
सखी राधा ही भाळली होती,
त्याच शामसुंदराच्या भक्तिची,
माळ मीरेने ही माळली होती.......

सहजच.....

शब्द संपले की,
भावनांचा संवाद सुरु होतो,
अन आपोआपच अश्रुंचा,
ह्रदयाकडे प्रवास सुरु होतो.....

"वेंधळा"

भाव तुझ्या डोळ्यांमधले,
सांगत होते मजला काही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

मला आपलंसं करण्याच्या,
तुझ्या क्लुप्त्या सांगुन जात,
होत्या बरंच काही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

तुझ्या केसातल्या मोगर्‍याचा दरवळ,
माझ्या भोवताली घुटमळत राही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

तुझं ते अवचित येणं,
तिरप्या नजरेने खुणावणं,
जशी अवचित येणार्‍या पावसानं,
धरणी मोहरुन जाई,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

चांदण्या रातीचा तुझा तो सहवास,
तुझ्या साडीवर फवारलेल्या,
अत्तराचा सुवास,
भारलेला आसमंत कसा,
बेधुंद होऊ पाही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

कळत नकळत एक फुल,
भ्रमराच्या प्रितित,
गुंतुन राहु पाही,
मी मात्र वेंधळा मुलखाचा,
शेवट पर्यंत समजु शकलो नाही....

नंदू

Monday, February 14, 2011

"बाकी काही नाही"

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन,
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन...
कावरं बावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही,
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही...

जेवता जेवता जिवघेणा लागेलही ठसका,
घरचे म्हणतील...
कसा लागतो उठता बसता सारखा सारखा...
चेहरा लपवत,डोळे पुसत पाणी प्यावे थोडे,
बोलण्या आधी आवाजाला सांभळावे थोडे...
सांगुन द्यावं...
काळजी करण्या सारखं बिलकुल काही नाही,
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही...

जेवल्या नंतर चेहर्‍यावरचे ओघळही सुकले,
अंगणातले पारीजातकही
कारण विचारण्या थोडेसे वाकले.......
आवंढा गिळत,हलकेच हासत,
कातर आवाजाने मन मोकळे केले,
आणि म्हटले...
कोमजण्या सारखं बिलकुल काही नाही,
कुणी तरी आठवण काढतंय बाकी काही नाही...

"वेदना"

"वेदना".......
हिच तर "वेदना" आहे सार्‍या भारताची,
ती कुणाला कळत नाही........
जखम भळभळतेय उरीची,
पण रक्तच गळत नाही.........
उदासीन राज्यकर्ते,
लाचार आहे जनता.......
मग उगीचंच तुम्ही,
भारताला "महान" का म्हणता...??
राष्ट्रकुलामध्ये भारताची मानहानी झाली,
महागाई भिडली गगनाला,जनता मात्र बेहाल झाली.....
साठेबाजानी भरल्या तुंबड्या, जनतेची झोळी मात्र रीती,
मग्रुर राज्यकर्त्यांना मात्र कसलीच राहीली नाही भिती....
वालीच उरला नाही कशाला,
हतबल झाली जनता......
मग उगीचंच तुम्ही,
भारताला "महान" का म्हणता...??

               नंदू

मागे वळुन पहाताना...

मागे वळुन पहाताना आठवतंय ते सारं,
तुझ्या मोकळ्या केसांतुन ते भिरभिरणारं वारं.......
हळुच चालताना मागे वळुन पहाण्याची तुझी ती अदा,
घायाळ झालेलो मी झालो त्यावर फिदा.......
हसताना पडणारी तुझ्या गालावरची खळी,
जशी उमलणारी गुलाबाची कळी............
आता हे फक्त आठवणीतच रमायचं,
पण आठवणीत रमणं तरी आता कसं जमायचं...
म्हणुनच जीव माझा हुरहुरतो, चुटपुटतो,
आणि नकळतच ओठांवर हे गाणं पुटपुटतो......

आताशा असे हे मला काय होते,
कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते.....
बरा बोलता बोलता "स्तब्ध" होतो,
अशी आर्तता शुन्य शब्दांत येते..........

                नंदू

"मैत्री"

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री.

                           नंदू

रहदारी

ही वाट हुंदक्याची थकली आता रडून,
रहदारी गच्च आहे "देवा" तुझ्यापुढून.....
नाहीच कळायचे तुला दुखः आमुचे,
ही "रहदारी" काढण्यातंच तुही गेलास पुरता गढून.....
अब्जावधींच्या देशात हिरवळ नाहीच कुठे,
निवडुंगानी टाकलंय त्याला पुरतं वेढून.....
नंग्या फकिरांच्या अंगावर ईथे वस्त्र नाही,
पण "तु" मात्र गेला आहेस पुरता "सोन्याने" मढून......

                        नंदू

"खेळ"

त्रीस खेळ चाले त्या मुक भावनांचा,
संपेच ना कधिही हा खेळ बावल्य़ांचा.....
दिवसा सुस्तावलेले ते जीव,
रात्री मात्र रंग रंगोटीत व्यस्त असतात....
आणि नवटांक,पावशेर मारुन आलेले "शेर",
त्यांचे रंगलेले चेहरे पहाण्यातच मस्त असतात......
अशातच कोणी मोठा भांडवलदार माडी चढतो,
त्याला पाहताच त्या "दलाला"चा आवाज किंचितसा वाढतो......
शेट "पटाखा" चाहीये क्या? तो दबलेल्या अवाजात विचारतो,
तो "शेट"ही इथे तिथे पहात "हो" म्हणण्यास थोडासा कचरतो......
.एक कळी रात्रभर कुस्करली जाते त्या दिवाणावर,
आपण मात्र नुस्तंच हळहळतो या अशा जीवनावर.........
असाच सौदा चालु रहातो त्या मुक भावनांना सोडुन वारयावर,
सकाळ झाली की, झिंगलेले पशु येतात थारयावर.......
मग असं वाटतं, संपणारच नाही का हा "खेळ",
हं, सोडा हो, हे असले विचार करायला कोणाला आहे इथं "वेळ".......

                        नंदू

माझ्या कोकणातलो "गणपति"

कोकणातल्या चाकरमान्यानी गर्दी केल्यानी मुलखात जावुक,
गणपति ईले की कोकणातलो चाकरमानी होऊन जाता असोच "भावुक"....
मग गौराई ईली की, मटनाचो नैवेद आणि वाईच वाईच हे "तिर्थ" घेतले,
ना मगे गौरी गणपतिचा विसर्जन करुन घराकडे परततले........
दशावतारी खेळे आणि भजनाची डबलबारी,
वड्याबरोबर काळ्या वाटाण्याचा सांभार भुरकत जातत घरी.....
माझ्या कोकणातल्या "गणपतिची" शान असताच अशी न्यारी,
म्हनानच कोकणतलो चाकरमानी करता दरवर्षाक मुलखाची "वारी"........

                    







नंदू

त्या खिडकीपाशी.......

तुझ्या येण्याची चाहुल लावीत उगीच घुटमळत होतो,
त्या खिडकीपाशी........
पण तु न येता तुझी आठवणच येउन थडकली,
त्या खिडकीपाशी........
मग आत दबलेला अस्फुटसा हुंदका फुटला,
त्या खिडकीपाशी........
आणि अवचित डोळ्यांतला ओघळ गालावर ओघळला,
त्या खिडकीपाशी........
मला वाटलं तुझ्या पैजनांचा आवाज झाला,
त्या खिडकीपाशी........
पण तु नव्हतीसच तिथे,ह्या जलधारा बरसत होत्या,
त्या खिडकीपाशी........
व्याकुळ मनाने बंद करण्यासाठी गेलो मी,
त्या खिडकीपाशी........
पण तिथे तु नसलीस,तरी तुझी "सावली"रेंगाळत होती,
त्या खिडकीपाशी........
घट्ट लाऊन घेतली मी ती "खिडकी",पुन्हा कधीही न येण्यासाठी,
त्या खिडकीपाशी........

                                  नंदू

"आठवण"

कसं कुणास ठाऊक?

मन आणि डोळे,

यांचं संगनमत झालंय.....

तुझ्या आठवणींत आता,

रात्र रात्र जागायचं ठरलंय.....

तुझी आठवण येताच डोळे भरुन येणं,

हे आता नित्याचंच झालय......

पण डोळे जरी भरलेले असले तरी,

मन मात्र रितं रितं होऊन गेलंय..........

खुपदा विचारतो मी माझ्या मनाला,

हे असं कसं होऊन बसलंय,

डोळे पहाताहेत वाट तुझ्या येण्याची,

अन मन मात्र केव्हाच "भुतकाळात" रमुन गेलंय.....

"अंगण"....

मुल जसं घर सगळं
भरुन टाकतं,
झाड तसंच अंगण सगळं
भारुन टाकतं.....
पाखरांना मायेने गळा लावतं,
वार्‍याला हिरवागार लळा लावतं.........
ऋतुंचं येणं होतं... जाणं होतं,
सगळं अंगण झाडासाठी गाणं होतं......
त्या अंगणात चाललेला
तो सुरपारंब्यांचा खेळ,
दुपारच्या क्षणी झाडाखाली
घालवलेला तो निवांत वेळ......
अंगण सकाळी पारिजातकाने
भरुन जातं,
तो फुलांचा सडा पहात
झाड कौतुकाने भारुन जातं.....
चिमुकल्यांना झाडाचा
आधार होतो,
थोरांचा अंगणात
राबता असतो......
ऋतुंचं येणं होतं... जाणं होतं,
सगळं अंगण झाडासाठी गाणं होतं...

"प्रचिति"

तु नव्याने भेटलीस आणि,
खरया प्रेमाची प्रचिती आली.......
भरभरुन प्रेम दिलेस तु मला,
तरीही राहीली माझी ओंजळ खाली......

आता पुन्हा तु नव्याने भेटावंस,
असं मनात राहुन राहुन वाटतं......
पण तु आता येशील की नाही?
या कल्पनेने माझं काळीजंच फाटतं........

मग हळुच तुझी आठवण घेउन,
हवेची हलकीशी झुळुक आली.......
अन तु नव्याने भेटलीस तेव्हा,
खरया "प्रेमाची" प्रचिती आली........

"सावली"....

"सावली".....
हळुच चोर पावलांनी,
ती माझ्या मागे धावली.....
मी मागे वळुन पाहीलं,पहातच राहीलो,
ती होती माझीच "सावली".....

मी तीला म्हटलं माझ्या मागे
धावु नको,पडशील अडखळुन.....
ती म्हणाली,मी तुझ्याशीवाय राहुच
शकत नाही रे,अन हसली खळखळुन.........

तीचं ते खळाळतं हास्य पहात असतानाच,
सांज वेळ केव्हा झाली,कळलंच नाही.....
भानावर येत मागे वळुन पहातो तर काय,
ती केव्हा निघुन गेली,कळलंच नाही......

"तुझा चेहरा"chuti

प्राजक्ताचं झाड कसं,
फुलांनी झाकलंय...
तुझा चेहरा पाहाण्या साठी,
थोडसं खाली वाकलंय...

अबोलीची फुलं कशी,
छान डवरलीत...
तुझा चेहरा पाहुन,
तिही थोडी बावरलीत...

जास्वंदाचं फुल अगदी,
बेहाल झालंय...
तुझा चेहरा पाहुन ते,
अधिक लाल झालंय...

हासत नाचत आल्या,
जुई आणि जाई...
तुझा चेहरा पाहुन,
म्हणाल्या "अग्गं बाई"...

झेंडुचं फुल गेलंय,
पार कोमेजुन...
ह्या चेहर्‍यापुढे निभावणार नाही,
गेलंय ते समजुन...

गुलाबाच्या फुलाची,
बातच न्यारी...
तुझा चेहरा पाहुन,
काळवंडलीय स्वारी...

तुझा चेहरा पाहाण्यासाठी,
मोगरा सरकला...
तुझा मुखडा पाहुन,
तोही भान हरखला...

अशा या बागेतली सर्व फुले,
म्हणती आपापसांत काही...
"देवा"ने या बाईला,
किती सुंदर "चेहरा" दिलाय नाही...

"देवा"ने या बाईला,
किती सुंदर "चेहरा" दिलाय नाही

             










नंदू

"लावण्य"

नाकात नथ,
अन कपाळी चंद्र कोर...
तुझं हे रुप करी,
मजला भाव विभोर...

नेसलीस तु साडी,
जरतारीची पैठणी...
जशी अवतरली पृथ्वीवरी,
इंद्रलोकीची लावण्यखणी...

चालताना चालशी तु,
मांजरीची चाल...
कटी कंबरे वरील साखळी,
करी जीवाचा बुरा हाल...

नखशिखांत नटलेलं तुझं,
हे रुप,आज नव्यानं पाहीलं...
अन माझ्या मनातलं,
काव्य मनातच राहीलं...

             नंदू

"पाखरु"...

एक पाखरु उडालं,
दोरीवर जाउन बसलं...
मला उडता येत नाही हे पाहुन,
गाली खुदकन हसलं...

अन म्हणालं,
कपडे वाळायच्या दोरीवर,
मला बसता येतं...
मी ही त्याला म्हणालो,
तुझ्या या अवखळ पणावर,
मलाही हसता येतं...

तसं ते,
पटकन लाजलं,
डोळ्याच्या कोनात हासलं,
अन पटकन उडालं...
माझं मन मात्र,
त्याच्या आठवणीत,
आकंठ बुडालं...

पण ते पाखरु,
कुठे दिसेना,
दोरीवर बसेना....
माझं मनही,
त्याला पाहील्या शिवाय,
स्वस्थ काही बसेना....

त्याची आठवण मला,
अशीच छळत राहाते...
उरीची जखम माझी,
उरातच भळभळत राहाते...

           








नंदू

"प्रेम"...

एक मधाळ भुंगा,
फुला भोवती,
रुंजी घालु लागला...
अन आपल्याही नकळत,
फुलावरच भुलु लागला...

त्या फुलालाही तेच हवं होतं,
तेही थोडसं लाजलं...
अन भुंग्याच्याही मनात,
फुलाविषयी प्रेम रुजलं....

जमलं हो जमलं,
त्या दोघांचं प्रेम जमलं...
दोघांचं मन एकमेकांत,
पुर्णपणे रमलं....

आणि एक दिवस,
गहजब झाला,
बागेच्या माळ्याने ते फुल खुडलं...
भुंगा झाला कासावीस,
त्याचं जीवना वरचं लक्षच उडलं....

भुंग्याचं मन,
विचार करु लागलं...
त्या फुलासाठी,
झुरु लागलं...

अन एक दिवस,
ते कुस्करलेलं फुल,
भुंग्यासमोर आलं.....
भुंग्याचं मन देखील,
विस्कळीत झालं...

ती दोघंही हातात घालुन हात,
चालु लागले आपली वाट...
पण दोघांच्याही मनात,
घातला जात होता,
आत्महत्येचा घाट....

प्रेम कहाणीत नेहमी,
असंच का होतं...
प्रेम नेहमी,
अयशस्वी का होतं....

पुराण काळा पासुन,
चालत आलेलं,
लैला मजनु,
शिरीन फरहादचं जे झालं,
तेच त्या फुलाच,आणि भुंग्याचं झालं......

आजच्या या निर्दयी जगात भेटतील,
अशी कैक कुस्करलेली फुलं,
अन विस्कटलेले भुंगे....
जी कधीच रमली नाहीत,
एकमेका संगे........

            








   नंदू

"प्रवास"

मीच माझ्यामध्ये,
पुरता हरवलो होतो...
तुझ्या अवचित जाण्याने,
किंचितसा भारावलो होतो....

तुझ्यासाठी मीच मनाला,
थोडं आवरलं होतं...
खचुन जाण्या पासुन,
बरचसं सावरलं होतं....

ह्रदयाची भळभळणारी जखम,
लपवता काही येईना...
उरीची ही सल मला,
थोपवता काही येईना....

उधानलेल्या वार्‍यासारखं,
मन भिरभिरु लागलं...
तुझ्या मोहमयी आठवणीत,
वेड्यासारखं फिरु लागलं....

इतक्या यातना देउन,
निघुन जाताना,
तुला काहीच कसं वाटलं नाही...
माझ्या ह्रदयाला छेद करताना,
तुझं काळीज कसं फाटलं नाही....

पण आता तु तर गेलीस,
न परतीच्या प्रवासा साठी...
अन मी इथे एकटा राहीलो,
तुझ्या आठवणीत,
मला शोधण्या साठी....

नंदू

"मुंबई-एक श्वास"

पळणार्‍या श्वासांमधुन,
एक वर्दी आली......
म्हणे मुंबईत वाहनांची,
भाऊगर्दी झाली.....(१)


धावणार्‍या वाहनांमध्ये,
एक श्वास गुदमरला....
रस्ता ओलांडण्यासाठी,
आकांताने धडपडला....(२)


सुसाट येणार्‍या गाडीने,
तो निष्पाप श्वास चिरडला....
जीवन चक्राखाली,
बेदरकार भरडला.....(३)


आरडा ओरड झाली,
श्वासांची गर्दी झाली.....
सायरनच्या आवाजाने,
श्वासांची पांगापांग झाली....(४)


आता अनेक प्रश्न पोलीसांचे?
प्रत्येकाचा श्वास चांगलाच टांगला...
अन,आपल्याला काय त्याचे म्हणत,
प्रत्येक जण बेफिकीरपणे पांगला...(५)


निपचित पडलेल्या श्वासाला घेउन,
पोलीसांची गाडी निघुन गेली...
त्या निष्प्राण कलेवराची,
इस्पितळात रवानगी झाली....(६)


गणगोत जमले सारे,
अचेतन त्या श्वासासाठी...
उरकुन टाकु एकदाचे,
या एकाच ध्यासासाठी....(७)


उद्या ऑफिसला जायचंय,
लेटमार्क मिळेल बाकी काही नाही....
बाई गं,
उद्याचं सास बहु चुकलं तर,
म्हणुन ही सगळी घाई.....(८)


हे सर्व लिहिण्यासाठी,
मन,लेखणीआधी धावत सुटलं....
अन मनात प्रश्नांचं,
नुसतं काहुर उठलं......(९)


अशी कशी ही सारी,
इतकी "बेदर्दी" झाली...?
काही नाही मुंबईत,
भावना शुन्य लोकांची,
भाऊगर्दी झाली......(१०)



               







नंदू....

"क्षितिजापार"

उडत्या पाखरांना,
परतीची तमा नसावी...
नजरेत त्यांच्या सदैव,
नवी दिशा असावी...
घरट्याचे काय हो,
बांधता येईल केव्हाही...
क्षितिजांच्या पलीकडे,
झेप घेण्याची ईर्षा असावी...

क्षितिजा पलीकडच्या जगातही,
बंधुप्रेमाची आस असावी...
लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही,
जमीनीवरील पायांची जाग असावी...
घरट्याचे काय हो,
ते सर्वच बांधतात क्षितिजापार...
पण आपल्याच वतनात उभारण्याची,
एक महत्वाकांक्षी ओढ असावी....

राहुन राहुन एकच वाटतं,
या पाखरांची पिल्लं तर,
विसरणार नाहीत ना....?
नाही......!!!
मातृभुमीची हाक आहे ती,
मनोमनी वाटतं,अगदी मनोमनी,
सार्‍या आसमंतात ती गुंजत रहावी...
सार्‍या आसमंतात ती गुंजत रहावी....

                 








नंदू         

"गर्दी"...

पाउले चालती ऑफिसची वाट,
लोकलच्या दारी देवा गर्दी अफाट,
एकाच्या पायावरी दुसर्‍याचा पाय,
घामाच्या वासाने गुंगी येई दाट........(१)

शब्दाने शब्द कसा वाढत वाढत जाइ,
दारातल्याने फोडलं बघा आतल्याचं कानफाट,
बसणारा समजतोय स्वतःला बादशहा,
उभ्याच्या मस्तकाचा होइ जळफळाट.......(२)

फर्स्ट क्लासची गर्दी कशी सर्व पांढरपेशी,
प्रत्येकाच्या मोबाईलवर,
चालली शेअर मार्केट्ची चौकशी,
मराठी उच्च वर्ग मात्र वाचतोय पुस्तक,
अत्तराच्या घमघमाटाने भणभणतंय मस्तक...(३)

दहशतवादाने जेव्हा केले बॉम्बस्फोट,
माणुसकीचं दर्शन घडलं तेव्हा आम्हा थेट,
जख्मी आणि मृत काहीच नव्हतं कळत,
गर्दीचं मन तेव्हा झालं होतं विराट..........(४)

म्हणुनच म्हणतो देवा.......
पाउले चालती ऑफिसची वाट,
लोकलच्या दारी देवा गर्दी अफाट,
धकाधकीच्या जीवनातही होवो,
"मानवतेची" भरभराट........(५)                            

                         







नंदू

मैत्र जीवांचा.....

मैत्रीला न जात न पात,
तीला नसतो कधी धर्म,
ह्रदयात आमरण जपावी,
हेच अपुले नित्यकर्म....(१)

मैत्री म्हणजे काय हो,
ह्रदया पलीकडले भाष्य,
नित्य जपुन ठेवावे असे,
मधुर मोहक हास्य...(२)

मैत्री म्हणजे एक,
ह्रदय पटलावरचे सुंदर चित्र,
मित्रत्वाच्या कुंचल्याने,
त्याला आपण रंगविले मात्र...(३)

कधी शिशिर,कधी बहर,
मौसम येत असतो ऋतुंचा,
बारमाही प्रवाह वाहे,
ह्रदयी आपुल्या मैत्रीचा....(४)

आणि शेवटी.........
दगडाला या झाला,
स्पर्श परिसांचा,
मित्रांच्या प्रेम वर्षावाने,
हा दगड झाला.......
"मैत्र जीवांचा".......(५)

                








  नंदू....

"सज्जातली आठवण"

त्या कातर सांज वेळी,
तु सज्जात उभी असताना,
मी पाहीले होते तुला,
मला पाहुन हसताना......(१)

आज ह्या कातर वेळी,
तु तशीच,
सज्जात उभी असताना,
आज मी पाहीलं तुला,
मला पाहुन हळुच,
डोळ्याची कडा पुसताना.....(२)

तरुण पणीच्या आठवणी त्या...
भुरभुरणार्‍या केसांना सावरत,
तुझं ते सज्जात उभं रहाणं,
अन हळुच चोरट्या नजरेने,
माझ्याकडे चोरुन पहाणं.....(३)

दिवस कसे मखमाली पिसांसारखे,
केव्हा सरले नाही कळले,
अन तुझ्या त्या मधाळ हास्याने,
असेच मला रात्रंदिन छळले.....(४)

पण आज,
आज त्या सज्जाकडे पाहाताना,
मन कसं कातर कातर होतं,
तुझं ते सज्जात न दिसणं,
मनाला छिन्नविछिन्न करतं.......(५)

भास की आभास हा,
काही काही कळत नाही,
तु सज्जात उभी आहेस,
असंच पुन्हा पुन्हा वाटत राही.......(६)

आज पुन्हा,
परतीच्या वाटेवर असताना,
सहजच सज्जाकडे पाहीले,
अन तुझ्या आतुरलेल्या डोळ्यांतुन,
आसवांचे झरे खळकन वाहीले.....
अन तुझ्या आतुरलेल्या डोळ्यांतुन,
आसवांचे झरे खळकन वाहीले.....(७)

                             










नंदू

सहजच......

त्याच्या येण्याने ह्रदयाची जखम,
पुर्णपणे भरली होती.....
त्याच्या मिठीत माझी "प्रित",
पुर्णपणे बहरली होती......
विस्कटलेले मन माझे,
आवरता आवरे ना......
कारण........
त्याच्या प्रेमपाशात एक प्रिया,
मनोमन मोहरली होती........

मोहरलेल्या त्या वेड्या प्रियेने,
एक वेडी आस लावली होती,
चतुर भ्रमराची चतुर प्रित,
भोळ्या प्रियेला भावली होती.......
कोणाचं काही ऐकेना,
मनालाही साहवेना,
कारण.........
एक मासोळी कोळ्याच्या जाळ्यात,
अलगदपणे गावली होती......

                 नंदू

"तुजविण"...

तुज विण सख्या रे...वाट किती पाहु मी,
तुझ्या विरहाचे दुखः असे किती दिस साहु मी...
तु प्रेमाची "साद" दे,अथवा ना दे मजला,
या अश्रु आवेगात कित्येकदा वाहु मी.....(१)

हि विरहाची वेदना कुणा कशी सांगु मी,
जळत्या ह्रदयातला निखारा कुणा कसा दावु मी...
तु प्रितीची साथ दे,अथवा ना दे मजला,
तुझ्या नसण्याचं रीतंपण किती दिवस लेवु मी...(२)

कालच्या तुझ्या आठवणींनी किती काळ हर्षु मी,
स्वप्नांतल्या तुझ्या लोचनांना किती वेळा स्पर्शु मी...
तुझ्या ह्रदयी स्थान दे,अथवा ना दे मजला,
तुझ्यासाठी किती वेळा फिरुनी नव्याने जन्मु मी...(३)

                          नंदू

नामदारांचा "आदर्श"....

हा,हा,हा......
मा.मुख्यमंत्र्यांची पहा,
ही अजब जगरहाटी,
आप्तांना वाटुन टाकली,
काही "आदर्श" घरटी......(१)

कारगिलचे नायक,
बिचारे राहिले उपाशी,
उच्च अधिकार्‍यांना मात्र,
दुध तुपाची वाटी........(२)

काय चाललंय देवा हे,
आजच्या कलियुगात,
सामान्य माणुस करी,
घरासाठी वणवण,
माजी मंत्र्यांच्या नशिबी,
मात्र "आदर्श" सोसायटी......(३)

कसा ठेवावा आजच्या पिढिने,
"आदर्श" तो यांचा...?? मग,
"कृष्णकुंज"चा जयघोष करीत,
फिरती ही आजची पोरटी......(४)

                  नंदू

"अनोखी प्रेमकहाणी".....

दोघांच्या नजरेची भेट,
झाली दादर स्टेशवरती थेट,
कारण प्लॅटफॉर्म नं.१ ची,
गाडी झाली होती लेट......(१)

मुक झाली होती भावना,
खडखडाट गाडीचा झाला बहीरा,
तीचेही फक्त ओठच थरथरले,
त्याच्याही प्रेमाचा रंग झाला गहीरा....(२)

मग रोजच होऊ लागल्या गाठीभेटी,
तोही झुरु लागला तिच्यासाठी,
तिनेही नजरेनेच दिली संमती,
त्यालाही तिची भावना समजली होती....(३)

आगळा हा रंग प्रेमाचा,
वेगळा हा ढंग प्रेमाचा,
तरल अशा प्रेमकहाणीचा,
दरवळला हा गंध प्रेमाचा.......(४)

"मुक" होती ती,अन तोही होता "बधिर"
जगावेगळ्या प्रेमासाठी दोघेही होते अधिर,
एका ऐलतीरावरच्या प्रेमाने गाठला,
लग्न बंधनाचा अनोखा पैलतीर..........(५)

                                         







नंदू...

ट्रॅफिक पोलिसाला जाळले, माझे काय गेले?

विश्वास नांगरे पाटील - शनिवार, ६ नोव्हेंबर २०१०(पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण)   बुधवारी पहाटे ट्रॅफिक डी. वाय. एस. पीं.चा फोन आला. हवालदार अनिल ऐतवडेकरांचा मृत्यू झाल्याची त्यांनी बातमी दिली. माझ्या कुटुंबातील व्यक्ती दगावली होती. मी सुन्न झालो. मनाला असंख्य सुया टोचल्याच्या वेदना झाल्या. एका रिक्षावर कायदेशीर कारवाई केली म्हणून पिसाळलेला रिक्षाचालक बेसावध हवालदारावर पाठीमागून पेट्रोल टाकतो आणि स्वत:चा पेटवलेला सदरा त्यांच्या अंगावर फेकून पोलीस हवालदाराचा जाळून खून करण्याचा प्रयत्न करतो. रुग्णालयात दाखल केलेल्या ऐतवडेकरांना उच्च मधुमेह, टी.बी.ने आधीच ग्रासले आहे. मात्र आगीने जळालेल्या कातडीने त्यांच्या फुप्फुसातून कार्बन साचतो व ते दिवाळीच्या मंगलदिनी पहाटे अखेरचा श्वास घेतात. ‘रात्र सरू दे, अंधार सरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे’ असा संदेश देणारी दिवाळी ऐतवडेकर कुटुंबीयांसाठी काळाकुट्ट अंधार घेऊन का आली?एका निर्ढावलेल्या गुन्हेगाराकडून एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यास जिवंत जाळण्याची घटना घडते आणि समाजमन मात्र थंड, शांत, शुष्कपणे त्या घटनेकडे उदासीनतेने पाहते. पोलिसी अत्याचाराची क्षुल्लक घटना घडली तरी एरवी आवेशाने फुत्कार काढणाऱ्या एकाही मानवाधिकार संघटनेने ‘ब्र’ही काढला नाही. पोलिसातल्या माणसाबद्दल सहानुभूतीची चर्चाही नाही, कुजबूजही नाही. जो पोलीस घडय़ाळाकडे न पाहता रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी अविरतपणे काम करतो. अपुरे, मनुष्यबळ, साधनसामग्रीची कमतरता, कामाच्या वेळांची अनियमितता, गुन्हेगारांशी रोज सामना आणि कौटुंबिक अस्वास्थ्य या दुष्टचक्रात अडकून तो अनेक व्याधी, विकार आणि आजारांचा बळी ठरतो, तरीही तो वेळप्रसंगी दंडुक्यांनी दहशतवाद्यांशी लढतो. तो समाजाला एवढा अप्रिय का? खरे तर समाजाला त्याचे ऋणी असले पाहिजे; पण तो त्यांच्या शिव्याशापाचा धनी का? त्याला का कोणी आपला मानत नाही? सिनेमे, टेलिव्हिजन त्याच्यामागे काळासारखे हात धुवून का मागे लागतात आणि दृकश्राव्य माध्यमे का विणतात त्याच्या बदनामीचे धागे? न्यायालय, सरकारी पक्ष वेळ मिळेल तेव्हा त्याला झोडते. काय कारणे असू शकतील, या सर्व प्रश्नांची? खरे तर सामान्य लोकांना अवैध गोष्टींमुळे, गुन्हेगारी वृत्तीच्या दादांमुळे, वाहतुकीमधील बेशिस्तीमुळे रोजच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्यावेळी एखाद्याचे रक्त सांडते किंवा संकटामध्ये अश्रू येतात त्या वेळी त्याला पोलीसदादाच आठवतो. वास्तविक कुठल्याही संकटात असताना परमेश्वरानंतर माणसाला पोलिसाची आठवण होते ही वस्तुस्थिती आहे. असे असताना सर्वसामान्य जनतेला पोलिसांबाबत आपुलकी नसल्याचे कारण काय असावे?पोलीस दलाने शंभर चांगली कामे केली तरी एक नकारार्थी काम करावे लागते. लोकांच्या स्वैर स्वातंत्र्यावर दंडुका ठेवून र्निबध आणावे लागतात. अनेकदा दोन गटांमध्ये भांडणे असतात त्या वेळी दोन्ही गटांना आपलेच बरोबर आहे, असे वाटत असते. सत्य असत्याची शहानिशा करून पोलीस कारवाई करतात. त्यामुळे एक गट नाराज होत असतो. पोलिसांना अटक करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ज्या लोकांवर कारवाई होते ते नाराज होतात.भारतीय समाजमनावर चित्रपटांचा व दृकश्राव्य माध्यमांचा मोठा पगडा आहे. पोलीस ‘भूमिका’ असल्याशिवाय ‘अपवाद’ म्हणूनदेखील आपल्याकडे सिनेमा बनत नाही; परंतु बहुतांश चित्रपटांमध्ये पोलिसांना खलनायक म्हणून दाखविले जाते. एखादा पोलीस अधिकारी ‘हीरो’ असला तरी त्याच्याबरोबर त्याचे खाते मात्र नकारात्मक पद्धतीने दाखविले जाते.याशिवाय माध्यमांमध्येसुद्धा आपल्याकडे ‘गुन्हेगारी’च्या बातम्यांना अतिरंजित स्वरूपात दाखविण्याचा कल असतो आणि नकळत हीरोचा दर्जा दिला जातो. पोलिसांनी केलेल्या सकारात्मक व प्रभावी कामगिरीला मात्र दुर्दैवाने ‘न्यूज व्हॅल्यू’ कमी दिली जाते. त्यामुळे निश्चितपणे  समाजमनावर प्रतिकूल परिणाम होतो. पोलीस हादेखील समाजाचा एक घटक आहे. त्यातही चांगल्या, वाईट वृत्ती असतात. कामाचा ताण, डय़ुटीच्या वेळेची अनियमितता यामुळे पोलिसांकडून काही वेळेस मानवाधिकाराचे उल्लंघन होते. मात्र या गोष्टींवरून विधिमंडळात व मीडियामध्ये खूप गदारोळ होतो. पोलीस हे ‘सॉफ्ट टारगेट’ आहे. त्यामुळे रोजच्या कामामध्ये, संयम, आत्मविश्वास व न्याय्य भूमिका ठेवून काम करताना होणारी कसरत पोलिसांसाठी जीवघेणी बनलेली आहे.गेल्या काही महिन्यांत आम्ही रिक्षावाल्यांचा बेशिस्तपणा व मुजोरी मोडायचा पुरेपूर प्रयत्न केला. वसईत त्याला विशेष करून प्रखर विरोध झाला. रिक्षावाल्यांनी बंद पाळला, रास्ता रोको केला. लोकांनीही पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. आम्हाला महाग पडते, रिक्षावाले आमच्या सोयीने कोठेही थांबतात, सीट्स कितीही घेतात; पण माफक भाडे आकारतात. आम्हाला त्रास नाही, तर मग पोलिसांची लुडबूड कशासाठी? असे अनेक प्रश्न निर्माण केले गेले; पण रोज होणारे अपघात, रस्त्यांची कोंडी पाहून आम्ही शिस्त लावण्यासाठी कारवाई चालूच ठेवली.एका ठाणे जिल्ह्णाात रोज अंदाजे तीन माणसे अपघातात दगावतात, अनेक जखमी होतात, पण त्याची प्रतिक्रिया कधीही उमटत नाही. ‘पिपात मेले ओले उंदीर, माना पडल्या मुरगळल्याविन’ या मर्ढेकरांच्या कवितेतील पिचलेल्या मुंबईकरांसारखे आम्ही पुन्हा त्या रिक्षाच्या खुराडय़ात चेंगरून बसायचे. अनेक अबलांचे विनयभंग लोचटपणे करणाऱ्यांचे कृत्य निलाजरेपणाने पाहत बसायचे. ‘रोज जगायचे व जगताना रोज मरायचे’ या दुष्टचक्रातून आम्ही कधी बाहेर येणार? ‘डोंबिवली फास्ट’मधील आपटेंसारखा आम्हाला राग केव्हा येणार आणि या सिस्टीममधल्या ‘वंगाळाला’ आम्ही कधी झुगारून लावणार? जर वेळेवर उपचार केले नाहीत तर आजचे दुखणे ही उद्याची मोठी व्याधी होणार आहे त्या व्याधीमुळे सामाजिक आजारपण निर्माण होणार आहे आणि मग त्यातून गटार तुंबल्यावर अनेक विषारी जीवजंतू तयार होतात, तसे महेंद्र केवटसारखे ‘विषाणू’ तयार होतील आणि जुजबी इलाज करून त्यांची कर्करोगासारखी होणारी विषारी वाढ आम्ही रोखू शकणार नाही.पण यावर इलाज करू पाहणाऱ्या यंत्रणा जर प्रामाणिकपणे झटत असतील तर त्यांना आम्ही प्रोत्साहन, पाठिंबा द्यायला नको का? मरिन ड्राइव्हवर रात्री नाकाबंदी करताना एका श्रीमंत बिघडलेल्या मुलीच्या आततायीपणाचा बळी ठरलेले उपनिरीक्षक शिंदे यांच्या अंत्यविधीस मी गेलो होतो. विवाहात ज्या पद्धतीने वधूला सजवतात, अशा पद्धतीने त्यांच्या पत्नीला अंत्यविधीच्यावेळी सजविले होते. त्या वेळी या भगिनीने आपल्या बांगडय़ा फोडून फोडलेला ‘टाहो’ आठवला की अजूनही मी दचकून जागा होतो. ऐतवडेकरांच्या पत्नीलाही त्यांच्या निधनाच्या धक्क्याने उच्चरक्तदाबाचा झटका आला. त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. अनेक वेदना होत असतानाही सलाईन तोडून त्या स्मशानभूमीत ऐतवडेकरांची अंतिम भेट घ्यायला आल्या होत्या.या असहाय्य विधवांच्या वेदनांशी समाजमनाचे नाते आहे का? आम्ही पटकन हे विसरत तर नाहीना? विसरणे दूर रोजच्या रहाटगाडग्याच्या जीवनशैलीत क्षणभर हे कुठे तरी नोंद घेण्यासारखे तरी आम्हाला वाटते आहे का? जर नसेल तर एक कविता खूप बोलकी आहे. या कवितेतले शब्द आमच्या बेसावधपणाला, उदासीनतेला चपराक देणारे आहेत आणि समाजातील सुप्त राक्षसी वृत्तीच्या विळख्याची चाहूल देणारे आहेत.
‘यदी तुम्हारे घरके एक कमरे में आग लगी हो
तो तुम दुसरे कमरे में गा सकते हो क्या?
यदी तुम्हारे घरके एक कमरे में लाश सड रही हो
तो तुम दुसरे कमरे में सो सकते हो क्या?
यदि इसका तुम्हारा जबाब हाँ है,
तो मुझे तुमसे कुछ भी नही कहना है!

राधा और मीरा....

बावरी राधा के प्यार की,
ये कैसी थी रीत,
मीराने भी शाम से,
ये कैसी लगायी थी प्रित...

सांवले मनोहर शाम भी,
दोनोसे करते थे प्रेम अपार,
एक के प्यार में थी भक्ति,
तो दुजी के भक्ति में था प्यार...

राधा थी शाम की दीवानी,
तो मीरा भी थी दीवानी हरि की,
उलझन में फंसे हुए प्राण है,
ऐसी कुछ अवस्था थी जगत मुरारी की...

मीरा ने पिया था प्रेमविष का प्याला,
राधा भी तो रही हरि प्रेम की प्यासी,
एक को थी हरि चरणों की आस,
तो दुजी हरि चरणों की दासी...

अचंबित था प्यार दोनों का,
भाव विभोर थी भक्ति,
एक रही हरि दरस की प्यासी,
तो दुजी के हिस्सेमें आयी विरक्ति....                       

                             









  नंदू

एकटं रहावसं वाटतंय....

आज खुप एकटं,
रहावसं वाटतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय......

आठवण ही पानावरच्या,
दवबिंदु सारखी असते,
क्षणात लख्ख तर,
क्षणात ओघळुन विसरणरी असते...
डोळे बंद करुन पुन्हा,
त्या आठवणींना गोंजारावसं वाटतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय.....(१)

हळु हळु त्या क्षणांना,
कलत्या वयाचं रुप आलंय,
नकळत का होईना पण,
डोक्यावर पांढर्‍या केसांचं जाळं झालंय...
कधी कधी वाटतं,
काय करु या अनुभवांचं,
खरच,जखम भळभळली,
तर काय होईल या मनाचं,
ऐन वसंतातल्या गार पाउसरुपी क्षणांना,
सोडुन कृत्रिम पावसात,
भिजल्याचं दुखः आज जाणवतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय........(२)

कलत्या सुर्याकडे पाठ,
करणारे सारेच असतात,
लांब होत जाणार्‍या,
सावल्यां सारखेच ते भासतात,
मनावरचं ओझं आता खुप,
जड झाल्यासारखं वाटतंय,
आयुष्यातील सुटलेल्या क्षणांना,
आज आठवावसं वाटतंय........
म्हणुनच आज फिरुन,
एकटं एकटं रहावसं वाटतंय........(३)

                







  नंदू

वेदनेची कविता

वेदनेतली कविता,
वेदनेतच का होरपळावी,
कवितेतली वेदना का,
आजन्म छळावी......(१)

प्रसवलेली कविता का,
वेदनेला दिसत नसावी,
सुखाचं माप ओलांडुन,
का दुखःला,
कवटाळुन बसावी........(२)

वेदनेच्या काळजात काही,
अशीच भावना असावी,
जशी मनाच्या गाभार्‍यात,
जणु कविता अमुर्त दिसावी.......(३)

कविमन हळवं असतं,
याची वेदनेला कल्पना नसावी,
म्हणुनच वेदनेच्या मनातली कविता,
वेदनेच्या मनातच रुसावी.......(४)

             










  नंदू

का...?

का विसरावंस तु मला,
अन का विसरावं मीही,
स्नेह बंधाचं प्रतिबिंब पडलंय,
बघ त्या गहिर्‍या पाण्यातही...(१)

का तोडावंस तु मला,
अन का तोडावं मीही,
जोडणारा रेशिमधागा बघ,
त्या फुलाच्या पराग कणांतही...(२)

का विस्कटावंस तु मला,
अन का विस्कटावं मीही,
नीट घातलेली घडी बघ,
त्या न विस्कटलेल्या शालीतही...(३)

का कुस्करावंस तु मला,
अन का कुस्करावं मीही,
हसणार्‍या पाकळ्या बघ,
त्या डोलणार्‍या फुलातही.....(४)

का रुसावंस तु माझ्यावर,
अन का रुसावं मीही,
ते निरागस हास्य बघ,
बागडणार्‍या ईवल्याश्या बाळातही...(५)

का अबोल व्हावंस तु,
अन का अबोल होऊ मीही,
तो गुंजणारा आवाज ऐक,
त्या स्पंदणार्‍या श्वासातही....(६)

कसं निरसावं हे सर्व,
कसं रुचेल मनासही,
जीवनाचा अर्थ कळतो,
त्या एकांतातल्या तृणासही...(७)

            








  नंदू

मित्रांना समर्पित....

फेसबुकवर शेती करणार्‍यांनो,
माझ्या गावच्या शेतात एकदा,
फक्त एकदाच नांगर चालवुन बघा......

गल्लीत एकमेकावर,
चिखलफेक करणार्‍यांनो,
एकदाच माझ्या शेतातला चिखल,
स्वतःच्या माथ्याला लावुन बघा......

दिल्लीच्या गल्लीत गोंधळ घालणार्‍यांनो,
स्वतःच्या अगदी स्वतःच्या मनात झाकुन,
स्वतःला "महाराष्ट्रात" मनमुराद झोकुन बघा......

कट्ट्यावर मित्रत्वाच्या गप्पा हानणार्‍यांनो,
एकदा फेसबुकच्या कट्ट्यावर येऊन,
आम्हा मित्रांच्या काळजात,हळुवार डोकावुन तर बघा.....

                  








  नंदू

"गगन भरारी"

निळ्या आभाळात मोकळा,
घेउ पाहात होतो "श्वास"
पंखातले बळ जरी ओसरले,
तरी दृढ होता "विश्वास".......

संकटं किती जरी आली तरी,
पंखातलं बळ स्फुरण पावतं,
संकटांशी सामना करावया ते,
वार्‍यावर स्वार होऊन धावतं.....

असलो जरी सान मी या,
आभाळी भरारी घ्यावयाला,
उरी विश्वासाचं भरोनी इंधन,
उभारलो भ्रमण करावयाला......

एक दिवस असा येईलच की,
सार्‍या आकाशी माझंच नाव असेल,
सारं जग अभिनंदन करीत असताना,
मन माझं तेव्हा खळखळुन हसेल.....

                          










  नंदू

"मन"...

मन नसतं तर ते,
कुणावर जडलं नसतं,
मन नसतं तर ते,
कुणाच्या प्रेमात पडलं नसतं,
मन नसतं तर ते,
कधी उधान झालं नसतं,
मन नसतं तर ते,
कधी बेधुंद झालं नसतं,
मन नसतं तर ते,
कधी गुदमरलं नसतं,
मन नसतं तर ते,
कधी धडधडलं नसतं,
आणि धडधडलंच नसतं जर मन,
तर आयुष्यावर रुसले असते,
काही मोलाचे घरंगळलेले "क्षण"...

                नंदू

"तुझी आठवण"

नाही,नाही म्हणताना,
तीची आठवण आली,
येताना डोळ्यांत अश्रुंची,
साठवण घेउन आली...

मन माझे अधिकच,
गडद होत गेले,
अन आठवणी सोबत,
तुझ्या प्रेमाचे रंग,
अधिकच गहीरे झाले...

मन माझे तुझ्या,
आठवणीकडे का ओढ घेते,
अन मनात नसतानाही,
ती आठवण अधिकच गाढ होते...

गर्दी मध्ये ती,
थोडी थोडी सौम्य होते,
एकांतात असलो की,
मात्र रम्य होते....

तुझ्या आठवणीतच,
हरखुन जायला का होते,
पण मागे मागे वळताना,
मन माझे आठवणीतच,
हरवुन जाते.....

आताशा तुझी आठवण,
खुप व्याकुळ करुन जाते,
कितीही नाही म्हटलं तरी,
आठवणींचं मोहोळ उठवुन जाते....

पण आता मात्र एक निश्चय केलाय,
की,तुला आठवणींतुन काढुन टाकायचं,
अन आठवणींच्या वहीचं शेवटचं पान,
थरथरत्या हातांनी फाडुन टाकायचं.....

                           










नंदू

अश्रुची व्यथा....

मीच माझ्या वेंधळ्या मनाला,
सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला,
अन आठवला माझ्या डोळ्यातला,
एक अश्रु खळकन निखळलेला.....

तोच अश्रु तुझ्या आठवणीतला,
अवचित असा हसवुन गेला,
अन पाणावलेल्या माझ्या डोळ्यांना,
हलकेच मग फसवुन गेला.......

निखळणार्‍या अश्रुला मीच,
रस्ता मोकळा करुन दिला,
अन अनोळखी वळण वाटेवर,
तोच माझं ह्रदय पिळवटुन गेला.......

आता मीही शांत झालोय,
अश्रुही ओघळुन गेलाय,
पण माझ्या गालावर मात्र,
निष्फळ प्रेमाची निशाणी,
सुकवुन गेलाय.........

              नंदू

"थेंब दवाचा"

थेंब एक दवाचा,
तृणपातीवर पडला,
पातीची नजर लवली जराशी,
थेंबाचा जीव पातीवरच जडला....

त्याच्या आठवणीने मग,
तीनेही अंग चोरुन घेतलं,
त्याचं नाव हळुच आपल्या,
ह्रदय पटलावर कोरुन घेतलं....

त्याच्या मादक स्पर्शाने,
पातीचंही अंग शहारलं,
अन पातीच्या सहवासाने,
थेंबाचंही मन मोहरलं.....

जन्मभर सहवासाची,
शपथ दोघांनी घेतली,
थेंबाने मग तृणपातीशी,
जवळीकही साधली.....


अचानक एक दिवस,
थेंब दवाचा विरघळुन गेला,
अन उपेक्षित प्रेमात,
तृणपातीचाही बहर गळुन गेला.....

                        







  नंदू

"मुंबईचा चाकरमानी"

रात्रीची निवांत मुंबई धावते,
सकाळी घड्याळाच्या काट्यावरती,
सर्व सामान्य मुंबईकारांचे,
पायच जणु धरणीवरी पळती....

कोंबड्याच्या बांगे आधी,
उठे येथला चाकरमानी,
भाजी पोळीचा डबा पहीला होई,
अन नंतर येते नळाला पाणी....

सकाळीच काळजी असते,
आठ पाचच्या लोकलची,
अन ती चुकली तर...तर,
ऑफिसात होणार्‍या लेट मार्कची...

लेट झाल्यावर ऑफिसात,
बॉसची ती खास दटावणी,
आर्जवे केलेली ती सबब,
घाम पुसत ओशाळवाणी....

तरीही संध्याकाळी शोधताना,
तो एक क्षण विरंगुळ्याचा,
सागराची ऐकत गाज,
खात एक एक दाणा शेंगदाण्याचा...

घरी आल्यावर पाहाताना,
तो चेहरा माघारणीचा,
आनंद तो काय वर्णावा,
तेवढ्यात त्या विरहणीचा....

रात्रीस जेवताना जेवण,
पिठलं आणि भाताचं,
आत्मा तृप्त करुन जातं,
जणु नातं पक्वान्नाचं.....

दिवस सुरु होतो,
जसा लगबगीने,
रात्रही होते त्याच,
सवयीच्या गडबडीने...

थकलेला चाकरमानी पहुडतो,
तृप्तीच्या सतरंजी वरती,
उद्या सकाळी पळण्याकरीता,
घड्याळाच्या काट्यावरती......

              







  नंदू

भ्रमर

त्या भ्रमराने...
पाहीलं एका कळीला,
पुर्ण बहरास आलेली,
भ्रमराच्या जीवाची ही,
कशी घालमेल झालेली.....

वयात येणार्‍या त्या कळीला,
भ्रमराची घालमेल लक्षात आली,
तेव्हाच दोघांच्या ही प्रेमाची,
कक्षा रुंद अशी झाली......

कळीने त्या भ्रमराच्या,
दोहोंचे वय लक्षात,
आणुन दिले,
भ्रमराच्याही ह्रदयाने,
ते शल्य हलकेच जाणले....

दोहोंच्या ह्रदयाचे रुदन,
कोणा कधी ना कळले,
मग दोहोंच्या मनांचे मार्ग,
आपापल्या दिशेला वळले....

सरत्या वयातही दोघांच्या,
मनातली प्रित,
तशीच ताजी होती,
भ्रमराच्या मनातही रुकार होता,
कळीही आनंदाने राजी होती.....

पण फुल,पक्षी जरी झाले,
तरी त्यांना माणसांचा,
कायदा कळला होता,
त्या फुलाचा मौसम गळला होता,
अन त्या भ्रमराचा पतंगही,
प्रेमाच्या ज्योतीवर जळला होता......

             







नंदू

शोकांतिका....

आताशा असे काय होते,
काहीच कळत नाही,
गोंधळलेले माझे मन,
रुळता रुळत नाही....

जेव्हा पाहातो त्या,
निश्पर्ण वृक्षाकडे,
त्या वृक्षाच्या ह्रदयाची,
जखम अखंड भळभळत राही....

सरीतेच्या प्रेमाला पारखा,
असा तो विव्हळ वृक्ष,
पाहुन सरीतेच्या डोळ्यांतुन,
अश्रु अविरत ओघळत राही......

दोघेही असतील समोरा समोर पण,
वृक्षाची सावली त्या व्याकुळ सरीतेला,
अन सरीतेचं पाणी त्या निश्पर्ण वृक्षाला,
जीवन भर कधीच मिळत नाही......

म्हणुनच राहुन राहुन वाटतं,
माझं मन रुळता रुळत नाही,
वळचणीचं पाणी वळचणीला वळत नाही,
अन तो वृक्ष एकटेपणात जळत राही.......

                 








नंदू

भग्न विराणी

तुझ्या आठवनीचा वडवानल,
माझ्या मनी शमता शमेना,
तुझ्या आठवणीं शिवाय,
हे मन माझे रमता रमेना.....

खुप व्याकुळ होऊन बसतो,
जेव्हा एकलकोंडा मी,
तुझ्या आठवणीं वरचा,
हिमनग जमता जमेना.....

बेधुंद वार्‍यात जेव्हा,
धावतो सैरवैर मी,
तुझ्या आठवणींची,
बेभान ज्योत निमता निमेना.....

शल्य उरी तुझ्या आठवणींचे,
घेउन जन्मभर फिरणे आले,
चिघळलेली जखम ह्रदयाची,
काही थांबता थांबेना.......

आता एकांतात ही तुझ्या,
आठवणींचीच सोबत असते,
आयुष्याची ही आर्त विराणी,
या भग्न ह्रदयी विरता विरेना.....

          








नंदू

"शोध"

बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
फिरत होतो कधीतरी,
बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
शोधत होतो काहीतरी.....

बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
माझं मी पण हरवत होतं,
ते पुन्हा मिळवण्याचा,
प्रयास करत होतो कधीतरी....

बिन चेहर्‍याच्या गर्दीला,
श्वासच नव्हता मुळी,
त्या हरवलेल्या श्वासांत,
मोकळा श्वास शोधत होतो कधीतरी...

तीच बिन चेहर्‍याची गर्दी,
तीच अस्तित्व हीन गर्दी,
अस्तित्व नसलेल्या गर्दीत,
माझं स्वत्व शोधत होतो कधीतरी...

माझं मलाच कळत नव्हतं,
या बिन चेहर्‍याच्या गर्दीला,
कधी विराम नाही का...?
कधी आराम नाही का...?
या धावणार्‍या गर्दीत,
अर्धविराम शोधत होतो कधीतरी...

अशी बिन चेहर्‍याची ही गर्दी,
तिला मिळेल का कधी चेहरा,
हरवलेल्या चेहर्‍यांना मिळेल का,
कधी ओळख स्वतःची.....
की ही अशीच दिवस रात्र,
चालु रहातील यंत्र बनुन मातीची....

माझ्या या प्रश्नाला,
उत्तरच नसते केव्हा,
म्हणुनच मी या,
बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
सामावतो स्वतःला कधीतरी....

       







नंदू

कविता

काही सुचत नाही,सुचत नाही,
म्हणुन त्याने एक कविता केली,
तिने ही ती छान आहे म्हणुन,
आपल्या छातीशी धरली,
तसा त्या कागदातुन,
एक उसासा बाहेर पडला,
तशी ती बावरुन अवघडली,
कागदाची गुंडाळी अधिकच,
आपल्या ह्रदयाशी कवटाळली,
अन वेड्यासारखी पहातच राहीली,
कारण..................................
कारण त्या कवितेच्या कागदातुन,
दोन आसवे खळकन घरंगळली.....
           










नंदू

"शब्द"

कधी केव्हा कसे कुठुन,
शब्द घरंगळत आले,
अन माझ्याही नकळत,
कागदावर विराजमान झाले...

शब्दांनीच ओवी सजली,
शब्दांनीच सजले गाणे,
शब्दच नसतील ओठी,
मग कसले धूंद तराणे....

कबीराचे रचले दोहे,
तुकयाचे अभंग रचले,
ज्ञानेश्वरीचे एकेक पान,
रसाळ शब्दांनीच सजले....

डोंगर माथ्याने घोंगावत,
एक एक शब्द येतो,
धनगरी गीताचा जसा,
ढोल कडाडुन वाजतो....

लाटांच्या गाजेत,सागराच्या कुशीत,
शब्द शब्द हिंदकळतो,
जसा कोळीयाचा राजा,
कोळीगीतावर डोलतो......

शब्द म्हणजे लावणीतला श्रृंगार,
शब्द म्हणजे पोवाड्यातला अंगार,
शब्दच नसेल दिमतीला,
फुकाचा तो श्रृंगार अन,
विझलेला तो अंगार......

शब्दांनीच साजरी होळी,
शब्दांनीच रंगते रांगोळी,
शब्दांचाच लावुन फुलबाजा,
साजरी होते दिवाळी......

शब्दांचा नसतो नेम,
शब्दांनीच फुलते प्रेम,
शब्दांचेच करुनी खेळ,
तरुणाईचा बहरतो "लव्ह गेम"...

शब्द ह्रदयाचा ध्यास,
शब्द मोगर्‍याचा सुवास,
शब्दावाचुन व्यर्थ सारे,
शब्द माझ्या काव्याचा "श्वास".....

या शब्दांचीच केली पंचारती,
शब्दांचीच केली तोरण काठी,
शब्दांचेच करतो हे काव्य बहाल,
रसिका, फक्त तुझ्याच साठी..........

         








नंदू

एक शहर ऐसा भी...

एक शहर ऐसा भी,
जहाँ आदमी पहले उठता है,
घडी के काटे बाद में,
जाग जाते है.......

एक शहर ऐसा भी,
जहाँ पहले जुते घीस जाते है,
दरबदर की ठोकरे खाने के बाद,
कही जाके आशियाँ बनता है.....

एक शहर ऐसा भी,
जहाँ आदमी के हौसले,
टुटने लगते है,
तब कही जाके,
कोई काम मिलता है...

एक शहर ऐसा भी,
जहाँ आदमी पहले,
बुढा होने लगता है,
बाद में उसके लिये,
शादी के रिश्ते आ जाते है......

एक शहर ऐसा भी,
जहाँ हौसले तो बुलंद है,
मगर काम की कमी है,
बेरोजगारी बढाने के लिये,
इतनी भीड इकठ्ठा जमी है.....

एक शहर ऐसा भी,
जिसने इतनी मुसिबते आने के बाद भी,
अपनी इंन्सानियत नही खोई है,
चट्टाने फौलाद की तरह बुलंद है,
मगर,सागर की हर लहर,
सिने में दर्द छुपा के रोई है.....

एक शहर ऐसा भी,
जहाँ ना ही घडी की सुईयों को है आराम,
ना ही चलते पावों को है आराम,
ऐसे शहर के सामने नतमस्तक होता हुँ,
और करता हुँ उसे दिलोजान से "सलाम"....

                 







नंदू

"ती"

मी माझ्याच विश्वात रमलो होतो,
ती कधी आयुष्यात आली,
कळलंच नाही...
काळ्या भोर डोळ्यांनी,
कधी आपलसं करुन गेली,
कळलंच नाही...

तिचे मानेवर रुळणारे,
लांबसडक केस,
कधी मनाला मोहवुन गेले,
कळलंच नाही...
गोबर्‍या गालावरच्या त्या,
नाजुक खळ्या,
ह्रदयाला कधी स्पर्शुन गेल्या,
कळलंच नाही....

लाल चुटुक ओठांवरचं ते,
गुलाबी हासु,
माझ्या दिलाची तार,
कधी छेडुन गेलं,
कळलंच नाही....
बेभान करणारं तिचं ते,
मादक सौंदर्य,
अंग अंगी माझ्या कधी,
रोमांच फुलवुन गेलं,
कळलंच नाही....

तिचे काळेभोर डोळे,
मला सारखे खुणावत होते,
मला भेटायला बोलावत होते,
कसं भेटावं,कधी भेटावं,
कळत नव्हतं काही मला.....
तिला भेटायची हुरहुर मात्र,
कळत होती माझी मला......

तिच्या मिठीत समावताना,
चंद्र ही चोरुन बघत होता,
कसा तो,कळलंच नाही.....
स्वप्नातुन जागा होताना,
कावरा बावरा झालो होतो,
कसं ते माझं मला,
कळलंच नाही......

ती मात्र मला अजुनही खुणावते,
स्वप्नात येउन अहोरात्र सतावते,
माझ्याही नकळत मी गुंतलोय,
का तिच्यात.....?
विचारत होतो मनाला,पण,
पुन्हा कधी डोळा लागला,
कळलंच नाही.......

पत्रं...

सहजच......
का कुणास ठाउक,
तुझी पत्रं डोळ्यासमोर येतात,
ह्रदयाला डागण्या देउन,
अवचितपणे छळत रहातात....

चटके देण्याचं काम,
पत्रांनी केलं तरी,
शब्द मात्र डोळ्यांवाटे,
अविरत गळत रहातात......

ओठ बांधलेले,
असतात हुंदक्यांनी,
अश्रु मात्र ह्रदयाकडे,
अलगद वळत रहातात......

आठवणीत येउन छळायचंच होतं,
तर हे पत्र तरी का......?
नकळत का होईना हे प्रश्न,
मनाला सतत जाळत रहातात.......

      








नंदू

"कमळ पुष्प"

पानगळीतल्या कमळाला पाहुन,
गुलाबाचं फुल तोर्‍यात म्हणालं,
तुझी पैदाईश आपली चिखल जागेत,
अन माझी बघ आल्हाददायी बागेत.....

कमळ दल थोडं हसलं अन,
गुलाबाला नम्रतेनं बोललं,
तुला सुंदरतेचा माज केवढा,
गर्व फुकाचा करु नको एवढा,
कारण.............
तुला वाहिलं जातं "शवापुढे"
अन माझा मान मात्र "देवापुढे".....

गुलाबाच फुल हिरमुसलं,
झाडामागे जाउन लपलं,
लाजरं कमळ पुष्प मात्र,
पानगळीवर शांतपणे पहुडलं......

       








नंदू

"अवखळ कविता"

सहजच......
मी म्हणालो तीला,
मलाच नेहमी,
नमतं घ्यावं लागतं,
ती म्हणाली मला,
माझं फक्त "सॉरी"
म्हटलं की भागतं......

मी म्हणालो तीला,
हा तुला भलताच,
"अ‍ॅटिट्युड" आहे,
ती हसुन,चिडवत म्हणाली,
आज माझा....
भांडणाचा "मूड" आहे......

मी म्हणालो आपण दोघं,
असेच भांडणार आहोत का..?
एकांतवासात असेच अश्रु,
सांडणार आहोत का...?

ती म्हणाली नाही...
तु सॉरी म्हटलंस,
की माझं मन पाघळतं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब होऊन विरघळतं.....

मग मी ही तीला हळुच,
कवेत घेऊन म्हणालो "सॉरी"
तशी ती ही मुरकत म्हणाली,
फिर पहले क्युँ, "जान" ली हमारी.......

       










नंदू

प्रेम..... अळवावरचं पाणी

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
हातात येतंय असं वाटत असताना,
निसटुन जातंय क्षणोक्षणी.....

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
म्हणुन ह्या मृगजळालाच तर,
भुलतात कित्येक जणी.........

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
म्हणुनच आभाळाच्या प्रेमाला,
आतुर असते धरणी.........

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
आभाळही आपल्या असफल,
प्रेमाची ग्वाही देतं,
मुसळधार अश्रु गाळुनी.......

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
सागराच्या मिलना करीता,
प्रेमातुर सरीता ही असते,
निघालेली वळणा वळणांतुनी.......

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
दुभंगलेला पतंग ही,
देई स्वतःला ज्योतीत झोकुनी.......

म्हणुनच या अळवावरच्या पाण्याच्या,
वाटेला जाउ नका हो कुणी,
कारण.......

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
हातात आलंय असं वाटत असताना,
निसटतंच प्रत्येक क्षणी.........

     








  नंदू

वही अन पेन

वही अन पेनाची,
नजरा नजर झाली,
शब्दां संगे दोघांची,
अनोखी प्रित बहरली...

वही थोडी लाजली,
अन हळुच हुंकारली,
शब्दांनीच पेनाची,
प्रित साकारली....

वहीच्या पांढर्‍या शुभ्र,
नाजुक ह्रदयावर,
तीन शब्द उमटले,
निळ्याशार रक्ताने,
पेनाने I LOVE U म्हटले....

लाजेने चुर झालेली वही,
दिसु लागली अधिकच देखणी,
पेन ही आले खुपच फॉर्मात,
छान बोलु लागली त्याची लेखणी....

इकडे पेनाला एक वेगळीच ,
चिंता खात होती,
खोडरबराची त्याला खुप,,
भिती वाटत होती.....

रबराने ही दिला,
त्या दोघांना दुजोरा,
म्हणाला,माझा पाठींबा,
आहे तुमच्या मिलनाला....

कव्हराने वहीला साक्ष दिली,
पेनाला टोपणाची साक्ष मिळाली,
अन दोहोंच्या ही मधुर मिलनाची,
रात्र साजरी झाली.......

अशी ही वही अन पेनाच्या,
अजब प्रेमाची,गजब कहाणी,
साठा उत्तरा सफल,संपुर्ण झाली,
अन आमच्या चिंटुला,
"सुलेखना"चं बक्षिस मिळवुन गेली.....

      







   नंदू