Monday, February 14, 2011

"सज्जातली आठवण"

त्या कातर सांज वेळी,
तु सज्जात उभी असताना,
मी पाहीले होते तुला,
मला पाहुन हसताना......(१)

आज ह्या कातर वेळी,
तु तशीच,
सज्जात उभी असताना,
आज मी पाहीलं तुला,
मला पाहुन हळुच,
डोळ्याची कडा पुसताना.....(२)

तरुण पणीच्या आठवणी त्या...
भुरभुरणार्‍या केसांना सावरत,
तुझं ते सज्जात उभं रहाणं,
अन हळुच चोरट्या नजरेने,
माझ्याकडे चोरुन पहाणं.....(३)

दिवस कसे मखमाली पिसांसारखे,
केव्हा सरले नाही कळले,
अन तुझ्या त्या मधाळ हास्याने,
असेच मला रात्रंदिन छळले.....(४)

पण आज,
आज त्या सज्जाकडे पाहाताना,
मन कसं कातर कातर होतं,
तुझं ते सज्जात न दिसणं,
मनाला छिन्नविछिन्न करतं.......(५)

भास की आभास हा,
काही काही कळत नाही,
तु सज्जात उभी आहेस,
असंच पुन्हा पुन्हा वाटत राही.......(६)

आज पुन्हा,
परतीच्या वाटेवर असताना,
सहजच सज्जाकडे पाहीले,
अन तुझ्या आतुरलेल्या डोळ्यांतुन,
आसवांचे झरे खळकन वाहीले.....
अन तुझ्या आतुरलेल्या डोळ्यांतुन,
आसवांचे झरे खळकन वाहीले.....(७)

                             


नंदू

No comments:

Post a Comment