Monday, February 14, 2011

"शोध"

बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
फिरत होतो कधीतरी,
बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
शोधत होतो काहीतरी.....

बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
माझं मी पण हरवत होतं,
ते पुन्हा मिळवण्याचा,
प्रयास करत होतो कधीतरी....

बिन चेहर्‍याच्या गर्दीला,
श्वासच नव्हता मुळी,
त्या हरवलेल्या श्वासांत,
मोकळा श्वास शोधत होतो कधीतरी...

तीच बिन चेहर्‍याची गर्दी,
तीच अस्तित्व हीन गर्दी,
अस्तित्व नसलेल्या गर्दीत,
माझं स्वत्व शोधत होतो कधीतरी...

माझं मलाच कळत नव्हतं,
या बिन चेहर्‍याच्या गर्दीला,
कधी विराम नाही का...?
कधी आराम नाही का...?
या धावणार्‍या गर्दीत,
अर्धविराम शोधत होतो कधीतरी...

अशी बिन चेहर्‍याची ही गर्दी,
तिला मिळेल का कधी चेहरा,
हरवलेल्या चेहर्‍यांना मिळेल का,
कधी ओळख स्वतःची.....
की ही अशीच दिवस रात्र,
चालु रहातील यंत्र बनुन मातीची....

माझ्या या प्रश्नाला,
उत्तरच नसते केव्हा,
म्हणुनच मी या,
बिन चेहर्‍यांच्या गर्दीत,
सामावतो स्वतःला कधीतरी....

       







नंदू

No comments:

Post a Comment