Sunday, May 22, 2011

तिन्ही सांज

तिच तर वेळ असायची,
तु तुळस पुजायला येण्याची,
न हिच संधी असायची मला,
तुला चोरुन पहाण्याची....

तेव्हाच बहरलेला असायचा प्राजक्त,
गालही तुझे दिसायचे मला आरक्त,
तुझ्या डोळ्यांनाही घाई असायची,
झालेली कुणाला तरी शोधण्याची....

पहिली भेट अन पहिला पाऊस,
तो कधीही विसरुन नको जाऊस,
मला झाला होता येण्यास उशीर,
पण तु त्या पावसातही आतुर,
वाट पहात होतीस माझ्या येण्याची....

किती ही विसरु म्हटलं तरी,
न विसरता येणार्‍या त्या आठवणी,
मला आठवत आहे अजुन ही,
तुझी ती नेहमीची सवय,
मला पाहुन....
लटकेच मानेला झटका देण्याची....

खुप जगलो ते हळवे क्षण,
खुप जागवल्या त्या आठवणी,
मनीची ती हुरहुर कमी होत चाललीय,
कुठेतरी मनाला चाहुल लागतेय,
तु माझ्या पासुन दूर जाण्याची....

आताशा तु ही नाहीस मज जवळ,
आठवणी ही पुसल्यात जवळ जवळ,
आता दिवस कललाय तिन्ही सांजेकडे,
मात्र डोळे वाट पहाताहेत,
कधी तरी अंधार रात्र येण्याची....
नंदू

आधार

वृक्षाचा आधार घेणं,
हा वेलीचा धर्म आहे,
तिला निराधार न करणं,
हे त्या वृक्षाचे कर्म आहे....

वृक्षाचा आधार घेत वेल,
चहुकडे फोफावत जाते,
जणु काही ती त्याच्या,
ह्रदयापर्यंत झेपावत जाते....

वेलीचे अस्तित्व त्या,
वृक्षावर आवलंबुन असते,
म्हणूनच ती त्या वृक्षाला,
सतत कवटाळुन असते....

असेच हे प्रेम संसाराच्या,
भवसागरात झिरपुन असते,
म्हणुनच "नवरा"रुपी वृक्षराजाला,
"पत्नी"रुपी फुलराणी बिलगुन असते....

नंदू

कल्लोळ

क्षणभराचाच तुझा तो स्पर्श,
आय़ुष्यभर विरहाची,
आठवण करुन देतो,
त्या विरहातही तुझ्या आठवाने,
क्षणभरच का होईना,
मी हरखुन जातो....

शांत निवांत नदीकाठी,
कडे कपार्‍यांचे सौंदर्य पहात,
एकटाच मी तल्लीन असतो,
माझ्या ही नकळत,
केव्हा कुणास ठाऊक,
समय कसा सरकुन जातो....

अन अचानक हवेची,
एक हलकिशी झुळुक,
तुझ्या येण्याची चाहुल देऊन जाते,
मन तुझ्या आठवणीतुन,
बाहेर येत असतानाच,
तुझा पायरव कानाजवळ,
हळुवार थिरकुन जातो....

विरह तुझा जीवघेणा,
एकांतातही बिलगुन आहे,
ह्रदयापाशी तुझ्या वेदनांचा,
कल्लोळ धडकुन जातो....

नंदू

लग्न म्हणजे...

लग्न म्हणजे...
दोन अनोळखी जीवांची रेशिमगाठ,
लग्न म्हणजे...
दूरवर एकत्र चालायाची पाऊलवाट,
लग्न म्हणजे...
एकमेकां वरचा सार्थ विश्वास,
लग्न म्हणजे...
एका ह्रदयाने दुसर्‍याला दिलेली आर्त साद,
लग्न म्हणजे...
भावी आयुष्याची पडणारी गोड गुलाबी स्वप्नं,
लग्न म्हणजे..
एकमेकां बद्दलचा आदर आणि प्रेम जोपासणं,
लग्न म्हणजे...
सागराने सरीतेला दिलेली बेधुंद हाक,
लग्न म्हणजे...
एक दुसर्‍याच्या ह्रदयातल्या भावना जपणं,
लग्न म्हणजे...
अवचित बरसणार्‍या पावसाच्या रेशीम धारा,
लग्न म्हणजे...
मनी फुलणारा मोरपंखी पिसारा,
लग्न म्हणजे...
ऐन वसंतात आलेला प्रेमाचा बहर,
लग्न म्हणजे...
आयुष्यभर सांभाळायचा काचेचा डोलारा,

असे हे दोन जीवांना एकत्र आणणारे "लग्न"
ते दोघे ही एकमेकांच्या सानिध्यात असतात मग्न,
पण विश्वास आणि आदर नसेल जर त्यांच्यात,
तर हे गुलाबी स्वप्नं क्षणार्धात होते "भग्न"........


नंदू

वीज कोसळली

वीजेचा लोळ कोसळावा तशी,
ती त्याच्यावर कोसळली,
त्यांच्यामधली लाजेची भिंत,
मात्र क्षणार्धात ढासळली.....

चंद्र ही होता साक्षीला,
सागराची गाज ही जोडीला,
आज एक वेगळ्याच धुंदीत,
जणु सरीता सागरात मिसळली.....

धुंद वारा ही दिमतीला,
मंद शीळ घालत अवतरला,
मनो मिलनाची ती निशा,
चांदणी होऊन चंद्रात वितळली.....

नंदू

तुच केलास ना हट्ट

मी नव्हतोच तसा राजी,
तुच केला होतास ना हट्ट,
बेधुंद कोसळणार्‍या पावसात,
जेव्हा तुझी मिठी पडली होती घट्ट....

तोच कोसळणारा बेधुंद पाऊस,
साथीला बेभान वहाणारा वारा,
त्या चांदण्या रात्रीत ही दिसत होतं,
मला तुझ्या चेहर्‍यावरचं मादक हासु स्पष्ट.....

चंद्र ही चिडवत होता चांदणीला,
झाडानं ही कवटाळलं होतं वेलीला,
अशा चांदण्या रात्रीत ती बेहोष चांदणी,
चंद्रावर झाली होती काहीशी रुष्ट.......

सागर ही बेभान,
धरीत्रीला कवेत घेण्या,
भ्रमर ही बेताल,
फुलातला मध चाखण्या,
असा हा निसर्गाच्या,
खेळातला मिष्किल हट्ट,
पहात ओलेती मनं आपुली,
झाली अधिकच घट्ट......
नंदू