Monday, February 14, 2011

"गर्दी"...

पाउले चालती ऑफिसची वाट,
लोकलच्या दारी देवा गर्दी अफाट,
एकाच्या पायावरी दुसर्‍याचा पाय,
घामाच्या वासाने गुंगी येई दाट........(१)

शब्दाने शब्द कसा वाढत वाढत जाइ,
दारातल्याने फोडलं बघा आतल्याचं कानफाट,
बसणारा समजतोय स्वतःला बादशहा,
उभ्याच्या मस्तकाचा होइ जळफळाट.......(२)

फर्स्ट क्लासची गर्दी कशी सर्व पांढरपेशी,
प्रत्येकाच्या मोबाईलवर,
चालली शेअर मार्केट्ची चौकशी,
मराठी उच्च वर्ग मात्र वाचतोय पुस्तक,
अत्तराच्या घमघमाटाने भणभणतंय मस्तक...(३)

दहशतवादाने जेव्हा केले बॉम्बस्फोट,
माणुसकीचं दर्शन घडलं तेव्हा आम्हा थेट,
जख्मी आणि मृत काहीच नव्हतं कळत,
गर्दीचं मन तेव्हा झालं होतं विराट..........(४)

म्हणुनच म्हणतो देवा.......
पाउले चालती ऑफिसची वाट,
लोकलच्या दारी देवा गर्दी अफाट,
धकाधकीच्या जीवनातही होवो,
"मानवतेची" भरभराट........(५)                            

                         







नंदू

No comments:

Post a Comment