Monday, February 14, 2011

"प्रवास"

मीच माझ्यामध्ये,
पुरता हरवलो होतो...
तुझ्या अवचित जाण्याने,
किंचितसा भारावलो होतो....

तुझ्यासाठी मीच मनाला,
थोडं आवरलं होतं...
खचुन जाण्या पासुन,
बरचसं सावरलं होतं....

ह्रदयाची भळभळणारी जखम,
लपवता काही येईना...
उरीची ही सल मला,
थोपवता काही येईना....

उधानलेल्या वार्‍यासारखं,
मन भिरभिरु लागलं...
तुझ्या मोहमयी आठवणीत,
वेड्यासारखं फिरु लागलं....

इतक्या यातना देउन,
निघुन जाताना,
तुला काहीच कसं वाटलं नाही...
माझ्या ह्रदयाला छेद करताना,
तुझं काळीज कसं फाटलं नाही....

पण आता तु तर गेलीस,
न परतीच्या प्रवासा साठी...
अन मी इथे एकटा राहीलो,
तुझ्या आठवणीत,
मला शोधण्या साठी....

नंदू

No comments:

Post a Comment