Monday, February 14, 2011

"मुंबईचा चाकरमानी"

रात्रीची निवांत मुंबई धावते,
सकाळी घड्याळाच्या काट्यावरती,
सर्व सामान्य मुंबईकारांचे,
पायच जणु धरणीवरी पळती....

कोंबड्याच्या बांगे आधी,
उठे येथला चाकरमानी,
भाजी पोळीचा डबा पहीला होई,
अन नंतर येते नळाला पाणी....

सकाळीच काळजी असते,
आठ पाचच्या लोकलची,
अन ती चुकली तर...तर,
ऑफिसात होणार्‍या लेट मार्कची...

लेट झाल्यावर ऑफिसात,
बॉसची ती खास दटावणी,
आर्जवे केलेली ती सबब,
घाम पुसत ओशाळवाणी....

तरीही संध्याकाळी शोधताना,
तो एक क्षण विरंगुळ्याचा,
सागराची ऐकत गाज,
खात एक एक दाणा शेंगदाण्याचा...

घरी आल्यावर पाहाताना,
तो चेहरा माघारणीचा,
आनंद तो काय वर्णावा,
तेवढ्यात त्या विरहणीचा....

रात्रीस जेवताना जेवण,
पिठलं आणि भाताचं,
आत्मा तृप्त करुन जातं,
जणु नातं पक्वान्नाचं.....

दिवस सुरु होतो,
जसा लगबगीने,
रात्रही होते त्याच,
सवयीच्या गडबडीने...

थकलेला चाकरमानी पहुडतो,
तृप्तीच्या सतरंजी वरती,
उद्या सकाळी पळण्याकरीता,
घड्याळाच्या काट्यावरती......

              







  नंदू

No comments:

Post a Comment