Monday, February 14, 2011

"तुझी सयं"

डोळ्यांतलं पाणी जेव्हा,
घरंगळत खाली येतं,
विदिर्ण माझं मन,
तुझ्या सयीनं ओलं चिंब होतं...

तुझ्या विना हे जगंच,
मला रितं रितं वाटतं,
तुझी सयं आली की,
माझं आभाळंच फाटतं.....

तुझी सयं येण्यासाठी,
काही कारण लागत नाही,
ती आली की मात्र मन,
रात्र रात्र जागत राही......

सवयीनंच मी आता,
तुझी सयं येण्याची,
वाट पाहत राहतो,
ती न आल्यावर,
आता सवयीनंच कोनांतुन,
माझा डोळा वाहत राहतो.........
नंदू

No comments:

Post a Comment