Monday, February 14, 2011

"तुजविण"...

तुज विण सख्या रे...वाट किती पाहु मी,
तुझ्या विरहाचे दुखः असे किती दिस साहु मी...
तु प्रेमाची "साद" दे,अथवा ना दे मजला,
या अश्रु आवेगात कित्येकदा वाहु मी.....(१)

हि विरहाची वेदना कुणा कशी सांगु मी,
जळत्या ह्रदयातला निखारा कुणा कसा दावु मी...
तु प्रितीची साथ दे,अथवा ना दे मजला,
तुझ्या नसण्याचं रीतंपण किती दिवस लेवु मी...(२)

कालच्या तुझ्या आठवणींनी किती काळ हर्षु मी,
स्वप्नांतल्या तुझ्या लोचनांना किती वेळा स्पर्शु मी...
तुझ्या ह्रदयी स्थान दे,अथवा ना दे मजला,
तुझ्यासाठी किती वेळा फिरुनी नव्याने जन्मु मी...(३)

                          नंदू

No comments:

Post a Comment