Monday, February 14, 2011

"अंगार"

विषण्णतेच्या काळ्या ढगांनी,
सार्‍या जगताला ग्रासलंय,
दहशतवादाच्या रक्ताळलेल्या हातांनी,
सभ्यतेच्या तोंडाला काळं फासलंय......

उपासमार,भ्रष्टाचार यांनी,
होरपळलीय जनता सारी,
मदांध सत्तेच्या लाचारांनी,
नाही दाखविली दिलगिरी......

आता जनताच रस्त्यावर आलीय,
विरोधाची आग ह्रदयी पेटुन उठलीय,
सत्तांध राज्यकर्त्यांची करण्या होळी,
क्रांतीची ज्वाळा धगधगुन पेटलीय......

एक दिवस मात्र येईल असा,
या भुतलावर अराजक माजेल,
निसर्ग ही मग होईल हतबल,
नरक ही शरमेने लाजेल......

     







नंदू

No comments:

Post a Comment