Monday, February 14, 2011

"खेळ"

त्रीस खेळ चाले त्या मुक भावनांचा,
संपेच ना कधिही हा खेळ बावल्य़ांचा.....
दिवसा सुस्तावलेले ते जीव,
रात्री मात्र रंग रंगोटीत व्यस्त असतात....
आणि नवटांक,पावशेर मारुन आलेले "शेर",
त्यांचे रंगलेले चेहरे पहाण्यातच मस्त असतात......
अशातच कोणी मोठा भांडवलदार माडी चढतो,
त्याला पाहताच त्या "दलाला"चा आवाज किंचितसा वाढतो......
शेट "पटाखा" चाहीये क्या? तो दबलेल्या अवाजात विचारतो,
तो "शेट"ही इथे तिथे पहात "हो" म्हणण्यास थोडासा कचरतो......
.एक कळी रात्रभर कुस्करली जाते त्या दिवाणावर,
आपण मात्र नुस्तंच हळहळतो या अशा जीवनावर.........
असाच सौदा चालु रहातो त्या मुक भावनांना सोडुन वारयावर,
सकाळ झाली की, झिंगलेले पशु येतात थारयावर.......
मग असं वाटतं, संपणारच नाही का हा "खेळ",
हं, सोडा हो, हे असले विचार करायला कोणाला आहे इथं "वेळ".......

                        नंदू

No comments:

Post a Comment