Monday, February 14, 2011

"अस्तनीतला निखारा"

काय हवंय त्या नराधमांना,
का असा नरसंहार चालवलाय त्यांनी,
दहशतवादाचा हा जळता निखारा,
का आपल्या अस्तनीत बाळगलाय त्यांनी...

हा दहशतवाद इतिहासापासुन,
अविरतपणे चालत आलाय,
हिटलरने ही साठ लाख ज्युंचा,
अमानुषपणे संहार केलाय...

अमेरिकेने ही हेच स्वप्नं,
आपल्या उराशी बाळगलं,
अन पंचेचाळीस साली,
हिरोशिमा बेचिराख झालं....

आता तालीबान्यांची असुरी ईच्छा,
घेतेय निरपराधांचा बळी,
शेजारचा पाकिस्तान ही,
खेळतोय यात अमानुष खेळी....

दहशतवादाच्या वणव्यात,
अवघा देश होरपळाय,
निर्दयतेच लाव्हा,
सार्‍या जगावर कोसळलाय....

ह्या कृरतेचा अंत सदैव,
विदारकच झालाय,
म्हणुनच प्रत्येक कृरकर्मा,
नेहमी सुळावरच गेलाय.....

प्रत्येकाने प्राण आता,
तळ हातावर घेतलाय,
दहशतवाद विरोधाचा दिवा,
आता अंगार होऊन पेटलाय.....

मानवतेला देखील,
पायदळी तुडवलंय त्यांनी,
आता सार्‍या विश्वालाच,
दावणीला बांधलंय त्यांनी......

दहशतवादाचा हा जळता निखारा,
का आपल्या अस्तनीत बाळगलाय त्यांनी,
का आपल्या अस्तनीत बाळगलाय त्यांनी.......

       नंदू

No comments:

Post a Comment