Thursday, February 17, 2011

"तिथे ही अन इथे ही"

कडाडुन वीज कोसळलीय,
तिथे ही अन इथे ही,
तिथे फक्त झाड कोसळलंय,
इथे कोसळलोय मीही अन तीही.....

सोसाट्याचं वादळ आलंय,
तिथे ही अन इथे ही,
उन्मळले मोठाले वृक्ष तिथे,
इथे उन्मळली,
दवबिंदुसह तृणपातही.......

जोराचा वणवा पेटलाय,
तिथे ही अन इथे ही,
चिंगारीचं रुप घेतलंय,
विझु लागलेल्या पणतीनंही......

झंजावात सुरु झालाय,
तिथे ही अन इथे ही,
अंगावर येऊ पहातेय,
शांत परतणारी लाटही......

घोंगावणारा वारा साद देतोय,
तिथे ही अन इथे ही,
तुतारीसम भासे आज,
शांत सागराची गाज ही........

धडधडणारी ह्रदये असतात,
तिथे ही अन इथे ही,
प्रितिची चाहुल लागते,
हळुवार ह्रदय स्पंदनातही,
तिथे ही अन इथे ही......









नंदू

No comments:

Post a Comment