Monday, February 14, 2011

"क्षितिजापार"

उडत्या पाखरांना,
परतीची तमा नसावी...
नजरेत त्यांच्या सदैव,
नवी दिशा असावी...
घरट्याचे काय हो,
बांधता येईल केव्हाही...
क्षितिजांच्या पलीकडे,
झेप घेण्याची ईर्षा असावी...

क्षितिजा पलीकडच्या जगातही,
बंधुप्रेमाची आस असावी...
लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही,
जमीनीवरील पायांची जाग असावी...
घरट्याचे काय हो,
ते सर्वच बांधतात क्षितिजापार...
पण आपल्याच वतनात उभारण्याची,
एक महत्वाकांक्षी ओढ असावी....

राहुन राहुन एकच वाटतं,
या पाखरांची पिल्लं तर,
विसरणार नाहीत ना....?
नाही......!!!
मातृभुमीची हाक आहे ती,
मनोमनी वाटतं,अगदी मनोमनी,
सार्‍या आसमंतात ती गुंजत रहावी...
सार्‍या आसमंतात ती गुंजत रहावी....

                 








नंदू         

No comments:

Post a Comment