Monday, February 14, 2011

"मुंबई-एक श्वास"

पळणार्‍या श्वासांमधुन,
एक वर्दी आली......
म्हणे मुंबईत वाहनांची,
भाऊगर्दी झाली.....(१)


धावणार्‍या वाहनांमध्ये,
एक श्वास गुदमरला....
रस्ता ओलांडण्यासाठी,
आकांताने धडपडला....(२)


सुसाट येणार्‍या गाडीने,
तो निष्पाप श्वास चिरडला....
जीवन चक्राखाली,
बेदरकार भरडला.....(३)


आरडा ओरड झाली,
श्वासांची गर्दी झाली.....
सायरनच्या आवाजाने,
श्वासांची पांगापांग झाली....(४)


आता अनेक प्रश्न पोलीसांचे?
प्रत्येकाचा श्वास चांगलाच टांगला...
अन,आपल्याला काय त्याचे म्हणत,
प्रत्येक जण बेफिकीरपणे पांगला...(५)


निपचित पडलेल्या श्वासाला घेउन,
पोलीसांची गाडी निघुन गेली...
त्या निष्प्राण कलेवराची,
इस्पितळात रवानगी झाली....(६)


गणगोत जमले सारे,
अचेतन त्या श्वासासाठी...
उरकुन टाकु एकदाचे,
या एकाच ध्यासासाठी....(७)


उद्या ऑफिसला जायचंय,
लेटमार्क मिळेल बाकी काही नाही....
बाई गं,
उद्याचं सास बहु चुकलं तर,
म्हणुन ही सगळी घाई.....(८)


हे सर्व लिहिण्यासाठी,
मन,लेखणीआधी धावत सुटलं....
अन मनात प्रश्नांचं,
नुसतं काहुर उठलं......(९)


अशी कशी ही सारी,
इतकी "बेदर्दी" झाली...?
काही नाही मुंबईत,
भावना शुन्य लोकांची,
भाऊगर्दी झाली......(१०)               नंदू....

No comments:

Post a Comment