Monday, February 14, 2011

"माझे रीतेपण"

माझे रीतेपण लपवण्याचा,
प्रयत्न होता केविलवाणा,
तुझ्या पुढे उभा होतो,
घेउनी चेहरा दिनवाणा.....

काही सांगण्याची धडपड,
करीत होते मन माझे,
शब्द ओठांतच विरघळले,
पाहुनी चेहरा हा लोभसवाणा....

मला बोलण्याचा अधिकार,
खचितच आहे तुला आता,
तु मला म्हणशील ही,
नक्कीच आहेस तु माणुसघाणा.....

ह्या हतबल चेहर्‍यामागचं रीतेपण,
तुला दिसलंच नाही गं कधी,
कारण........
तु आहेस कमालीची अनभिज्ञ,
अन मी आहे मात्र बापुडवाणा.....

त्या अनोळखी वळण वाटेवर,
तुझा हात सोडुन जाताना,
तुझी ओंजळ होती भरलेली,
माझ्या ओंजळीत मात्र...
तुझ्या आठवणींचा खजिना.....

   
नंदू

No comments:

Post a Comment