Monday, February 14, 2011

"थेंब दवाचा"

थेंब एक दवाचा,
तृणपातीवर पडला,
पातीची नजर लवली जराशी,
थेंबाचा जीव पातीवरच जडला....

त्याच्या आठवणीने मग,
तीनेही अंग चोरुन घेतलं,
त्याचं नाव हळुच आपल्या,
ह्रदय पटलावर कोरुन घेतलं....

त्याच्या मादक स्पर्शाने,
पातीचंही अंग शहारलं,
अन पातीच्या सहवासाने,
थेंबाचंही मन मोहरलं.....

जन्मभर सहवासाची,
शपथ दोघांनी घेतली,
थेंबाने मग तृणपातीशी,
जवळीकही साधली.....


अचानक एक दिवस,
थेंब दवाचा विरघळुन गेला,
अन उपेक्षित प्रेमात,
तृणपातीचाही बहर गळुन गेला.....

                          नंदू

No comments:

Post a Comment