Monday, February 14, 2011

प्रेम..... अळवावरचं पाणी

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
हातात येतंय असं वाटत असताना,
निसटुन जातंय क्षणोक्षणी.....

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
म्हणुन ह्या मृगजळालाच तर,
भुलतात कित्येक जणी.........

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
म्हणुनच आभाळाच्या प्रेमाला,
आतुर असते धरणी.........

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
आभाळही आपल्या असफल,
प्रेमाची ग्वाही देतं,
मुसळधार अश्रु गाळुनी.......

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
सागराच्या मिलना करीता,
प्रेमातुर सरीता ही असते,
निघालेली वळणा वळणांतुनी.......

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
दुभंगलेला पतंग ही,
देई स्वतःला ज्योतीत झोकुनी.......

म्हणुनच या अळवावरच्या पाण्याच्या,
वाटेला जाउ नका हो कुणी,
कारण.......

प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी,
हातात आलंय असं वाटत असताना,
निसटतंच प्रत्येक क्षणी.........

     
  नंदू

No comments:

Post a Comment