Monday, February 14, 2011

"उद्रेक"

जीवन महाग झालंय इथं,
काहीच स्वस्त नाही,
सामान्य जनतेनं...
उद्रेक कसा करावा,
काहीच समजत नाही.........

आंदोलनांचं पिक आलंय़,
आश्वासनांचा झालाय सुकाळ,
गरीबाच्या वाट्याला,
मात्र सदैव येतोय दुष्काळ,
जल्माचा भोग बघा कधी,
सरत नाही......
सामान्य जनतेनं...
उद्रेक कसा करावा,
काहीच समजत नाही.......

अवकाळी पावसानं,
नुकसान केलंय,
शेतकर्‍याच्या डोळ्यात कसं,
पाणी तरारुन आलंय,
थंडीनं अवघी जनता गारठलीय,
महागाईनं तर उंची गाठलीय,
पर यांना त्याच काही,
सोयर सुतक नाही....
सामान्य जनतेनं.....
उद्रेक कसा करावा,
काहीच समजत नाही.....

कोणी आरक्षणा साठी लढतोय,
कोणी प्रकल्पाला विरोध करतोय,
निषेध सभा आता नित्याच्या झाल्या,
कोणी इतिहास उकरुन काढ्तोय,
सामान्यांच्या माथी मात्र,
"बंद" ठोकला जाई.......
जनतेनं आता.....
उद्रेक कसा करावा,
काही समजत नाही.......

कुणी अर्वाच्य भाषेत,
शिव्या हाणतंय,
कुणी लोक प्रतिनिधीलाच,
सोलुन काढतंय,
हवालदिल ही जनता सारी,
कुणी मढ्याच्या टाळुवरचं,
लोणी खातंय,
मुख्यमंत्र्याला आता,
सनदी अधिकारी जुमानत नाही,
सामान्य जनतेनं...
उद्रेक कसा करावा,
काही समजत नाही......

शिक्षण महागलंय,
अन्न महागलंय,
डोईवरचं छप्पर महागलंय,
इथं आता मरण ही स्वस्त नाही,
तुम्हीच सांगा आता...
उद्रेक कसा करावा,
काहीच समजत नाही......

     










नंदू

No comments:

Post a Comment