Monday, February 14, 2011

भ्रमर

त्या भ्रमराने...
पाहीलं एका कळीला,
पुर्ण बहरास आलेली,
भ्रमराच्या जीवाची ही,
कशी घालमेल झालेली.....

वयात येणार्‍या त्या कळीला,
भ्रमराची घालमेल लक्षात आली,
तेव्हाच दोघांच्या ही प्रेमाची,
कक्षा रुंद अशी झाली......

कळीने त्या भ्रमराच्या,
दोहोंचे वय लक्षात,
आणुन दिले,
भ्रमराच्याही ह्रदयाने,
ते शल्य हलकेच जाणले....

दोहोंच्या ह्रदयाचे रुदन,
कोणा कधी ना कळले,
मग दोहोंच्या मनांचे मार्ग,
आपापल्या दिशेला वळले....

सरत्या वयातही दोघांच्या,
मनातली प्रित,
तशीच ताजी होती,
भ्रमराच्या मनातही रुकार होता,
कळीही आनंदाने राजी होती.....

पण फुल,पक्षी जरी झाले,
तरी त्यांना माणसांचा,
कायदा कळला होता,
त्या फुलाचा मौसम गळला होता,
अन त्या भ्रमराचा पतंगही,
प्रेमाच्या ज्योतीवर जळला होता......

             नंदू

No comments:

Post a Comment