Monday, February 14, 2011

"व्यथा"

विरह दाटला मनी सखया,
आसवांत मी भिजत राही,
सहज झिडकारुनी जाशी मजला,
तुला काही फरक पडत नाही.....

तुझ्या पावलांची गुंज,
माझ्या मनी घुमत राही,
सहज झिडकारीशी मजला,
तुला काही फरक पडत नाही......

तुझ्या येण्याची वाट,
मी मात्र मळत राही,
झिडकारशी माझ्या भावनांना,
तुला काही फरक पडत नाही......

तुझ्या आठवणींच्या सागरात,
ही मासोळी तडफडत राही,
हा आसवांचा सागर आटवताना,
तुला काही फरक पडत नाही......

लोभसवाणी तुझी छबी,
मी माझ्या ह्रदयी कोरलीही,
विदिर्ण करुन जाताना ह्रदय,
तुला काही फरक पडत नाही......

तुला काहीच फरक पडत नाही,
मग मीच का अस्वस्थ व्हावं बाई,
पण एक दिवस माझ्या....
माझ्या तसबिरीला हार घालताना,
तुला काही फरक पडेलंच की नाही.....

     










  नंदू

No comments:

Post a Comment