Monday, February 14, 2011

"विरह प्रिती"

तुझ्या प्रेम वर्षावात अखंड मी भिजते,
माझ्या रंध्रा रंध्रात तुझेच प्रेम वसते,
तुझेच स्वप्नं लोचनी मजला दिसते,
तुझ्या प्रतिक्षेत रात्रंदिन मी झुरते,
दुर जरी असशी मज पासुनी तरी,
सखया,प्रेम मात्र मी अनन्वित करते.....

तुझे लोभसवाणे रुप मजला घायाळ करते,
तुझ्या विरहाच्या अग्नीत रात्र रात्र जळते,
तुझ्या मिलनाची आस मज क्षण क्षण छळते,
तु माझा होशील का...???
हे मज कळते परी ना वळते,
तिरस्काराची तुझी नजर झेलुनी परी,
सखया,प्रिती तुजवरी अपरीमित करते.......

तुझ्या येण्याची वाट हल्ली रोजच मळते,
तुझी याद आली की डोळ्यांतुन सरीता ओघळते,
डोळे पाझरु लागले की मन आपसुकच विरघळते,
विरघळलेले मन माझे, तुला आठवुनी पांगुळते,
तुझा हा जीवघेणा विरह असह्य असला जरी,
सखया,प्रेमातुर ही हरीणी प्रेम जीवापाड करते......

    










  नंदू

No comments:

Post a Comment