Sunday, February 13, 2011

अथांग....

दुरवर पसरलेल्या अथांग सागराची,
ऐकत बसलो होतो धीरगंभीर गाज,
अन,मोहमयी सायंकाळी सुर्यदेवाने,
ल्यायला होता सुरेख सोनसळी साज......

बाजुलाच कुणाची तरी पाउले वाजली,
पैजणांच्या किणकिणटाने वाळुही थिजली,
अन,सहज बाजुस वळुन पाहीले तर,
सागराच्या कुशीत शिरुन धरणीही लाजली.......

म्हटलं बराच वेळ झाला,बरीच रात्र झाली,
तुझ्या ओल्या स्पर्शाने मोहरली गात्र सारी,
उठुन चालु लागलो होतो त्या रेशमी वाळुत,
तुझ्या आठवणींच्या बेड्यांनी जखडले पाय भारी..........

रुसुन जाण्याचा तुझा हा नेहमीचाच बहाणा,
वेडा झालो होतो तुझ्यासाठी असुन मी शहाणा,
पायाखालची वाळु कशी तेव्हा सरकत गेली,
रीता झालो होतो झटकुन तुझ्या आठवणींना........

अंगावर झेलत लाटा भिजुन गेलो होतो पार,
डोळ्यांत तुझ्या आठवणींची लागली होती धार,
विस्कटलेलं ह्रदय घेउन राहीलो पुन्हा मी उभा,
निश्चय मनाने केला आता घ्यायची नाही माघार.......
आता घ्यायची नाही माघार.........................

        












   नंदू

No comments:

Post a Comment