Wednesday, April 27, 2011

आज पुन्हा एकदा.....

आज पुन्हा एकदा पंख लावुन,
आभाळात उंच उडावसं वाटतंय,
आज आतुन मन हसत असलं तरी,
उगीचंच कुणावर तरी चिडावसं वाटतंय.....

का होतं असं कुणी सांगेल का...?
आभाळातील ईंद्रधनु रंगेल का...?
हे कुणाला तरी विचारावसं वाटतंय,
कुणाच्या तरी गळ्यात पडून,
मनसोक्त रडावसं वाटतंय.........

आज खुप दिवसांनी बहरलेय मी,
का कुणास ठाऊक पण,
त्याच्या आठवणींनी शहारलेय मी,
हे कुणाला तरी सांगावसं वाटतंय,
आज पुन्हा एकदा राहुन राहुन,
माझं मलाच चिडवावसं वाटतंय......

बावरलेल्या मनाने चहुकडे पाहतेय मी,
आज न राहुन स्वतःच लाजतेय मी,
हितगुज माझ्या मनाशीच करावसं वाटतंय,
आज आभाळाकडे तोंड करुन,
आनंदाने ओरडावसं वाटतंय..........

नंदू

No comments:

Post a Comment