Wednesday, April 27, 2011

आशेचा किरण

अंधारवाटेवरुन एकटाच होता चालत,
तो प्रकाश किरणाच्या शोधात.....

रक्ताळलेल्या पायांनी ठेचकाळत,
वेदनेला उराशी घट्ट कवटाळत,
मिट्ट काळोखात हातांनी चाचपडत,
एक तरी आशेचा किरण दिसेल,
या भावनेने आपल्याच नादात....

मैलोगणीक चालल्यानंतर मात्र,
एक आशेचा किरण दिसला,
त्याला पाहुन तोही ओशाळवाणं हसला,
म्हणाला मीही शोधत फिरतोय,
या निराशावादी जगात एकातरी,
आशावादी माणसाला.....

मग म्हणाला अरे वेड्यांनो,
निराश होण्याचे काहीच कारण नाही,
निराशावादी जगात एक तरी,
आशेचा किरण असतो,
जो नंतर मोठा प्रकाशमान होतो,
पण निराशावादी माणुस मात्र,
त्याच त्याच निराशेच्या गर्तेत,
सतत गटांगळ्या खातो.....

अन आशावादी माणुस मात्र,
पुन्हा उठुन चालु लागतो,
काळोख्या वाटेवरुन प्रकाशाच्या शोधात,
नव्या उमेदीने अन नव्या उभारीने,
आपल्याच नादात.....नंदू

No comments:

Post a Comment