Wednesday, April 27, 2011

बाप्पा.... "तुम्ही"

आज सकाळी सकाळी,
दारावर टकटक झाली,
अन माझी झोपच ऊडाली,
आळसावलेल्या डोळ्यांनीच,
दार उघडले,
आयला,पहातो तर काय,
दारात चक्क बाप्पा अवतरले....

अंगभर दुधाचा अभिषेक जसाच्य तसा,
धुप,उदबत्तीच्या धुराने खवखवतोय घसा,
पलंगावर माझ्या विराजमान झाले,
मी जरासा चिडलोच, तसे म्हणाले,
जरासा फ्रेश होऊन येतो,
आणि आल्यावर ब्लॅक कॉफी घेतो.....

मी त्यांना विचारलं आलात कसे,
म्हणाले उंदराला पार्क केलंय,
पार्कींग प्लेसमध्ये कसेबसे,
म्हणाले काल मंगळवार होता,
अंग बघ कसं सर्व आंबलंय,
त्यात पुरोहितांनी दुध अन,
फुलांनी तिंब तिंब तिंबलंय.......

मी जरासा साशंकच.....
तर म्हणाले लेट मी ईंट्रोड्युस,
माय नेम इज "गणेश शंकर देव"
मी उडालोच,म्हटलं,
देवा तुम्ही चक्क ईंग्लीश बोलता,
हसुन म्हणाले, अरे वेड्या,
मी विद्येचा वाचस्पती,चौसष्ट कलांचा देव,
अनेक भाषांमध्ये मुशाफिरी करतो,
अगदी चालता बोलता.....

माझ्या मनात विचारांचे काहुर,
ते जाणुन म्हणाले,
अरे तुम्ही येताना रोज,
माझ्याकडे घेऊन तुमच्या रडकथा,
देवाची ऐकणार आहे कोण व्यथा,
म्हणुनच आलोय तुझ्याकडे,
आपल्या मनीचं गुज सांगण्या,
भंडावुन सोडतात नुसते रडुन रडुन,
देतात माझ्याच मनावर डागण्या......

मी म्हटलं देवा,
आता दोन-चार दिवसांची लीव्ह टाक,
आणि फिरुन ये आल्प्स पर्वतांची रांग,
तसा म्हणाला,
चार वेळा फाडुन टाकलंय तिकिट स्वीस एअरचं,
ईमर्जंन्सीमुळे जाता आलं नाही,आता सांग....

बराच गप्पा टप्पा झाल्यानंतर,
म्हणाला आता मी जातो,
नैवेद्याची झालीय वेळ,
तुझ्याशी गप्पा खुप रंगल्या,
म्हणून कळलंच नाही कसा गेला वेळ....

तो गेल्यावर पुन्हा दारावर "टक टक"
मनात म्हटलं हा काही विसरला तर नाही,
तर दारात पुन्हा हा दत्त म्हणून उभा,
म्हणाला मी नाही काही विसरलो,
पण जाताना मात्र,
हीच निस्सीम श्रद्धा ठेऊन जातोय,
ती गोड मानुन घे रे बाबा......

मनात म्हटलं आता होताच हा बरोबर,
तर कोर्‍या कॉफिसाठी,
थोडं दुध मागितलं असतं,
अन चक्क आकाशवाणी झाली,
टिपिकल मराठी माणुस आहेस,
वेड्या, मागुन मागुन मागितलंस काय,
तर दुध.....
कालच्या अजिर्णामुळे माझ्या वाटेला,
आलंय बघ जरासं वरण,भाताची एक मुद....

मीही जरासा अंतर्मुख झालो,
पण देवाच्या व्यथेने,
उगाचंच आलं अंमळ हसायला,
अन अचानक थंड पाणी पडलं डोक्यावर,
बायको विचारत होती,
काय झालं असं झोपेत खुदुखुदु हसायला.........????









नंदू

No comments:

Post a Comment