Wednesday, April 27, 2011

एक श्वास

एक श्वास तुझ्या प्रितीचा,
मला हवा हवासा वाटतो,
तुझ्या स्पर्शा स्पर्शा मधुनी,
रोमांच ह्रदयी का दाटतो......

माझ्या श्वासात तुझा,
श्वास जेव्हा मिसळतो,
माझ जीव तेव्हा,
तीळ तीळ का तुटतो......

मुक्तपणे चांदण्यात फिरताना,
मी मात्र चांदणी होऊन जाते,
हळुच डोळ्यांच्या कडातुन पाहताना,
तुझा चेहरा चंद्रासम का भासतो.....

प्रितीचे स्वप्न हे माझे,
तुला ही ते पडते का रे,
वेड्या स्वप्नीच रमते मी रे,
डोळा मात्र टक्क जागा असतो.....

आता हे सर्व आठवताना,
माझी मी न राहते रे,
उरीच्या जीर्ण जखमांचा,
एकेक टाका का तुटतो.....

सरकणार्‍या आठवणींना मी,
मात्र आता कुलुपबंद केलंय,
तरी ही डोळ्यांत आठवणींचा,
अश्रु नेहमीच का साठतो......

प्रितीला विरहाचा शाप,
हा नित्याचाच आहे का रे,
म्हणुनच का प्रितीतला,
शेवटचा श्वास ही गोड वाटतो.....

नंदू

No comments:

Post a Comment