Wednesday, April 27, 2011

मी कोणी तुझा लागतो

मी विसरुनच जातो कधी,
मी कोणी तुझा लागतो,
मग का असा आठवणींत,
तुझ्या रात्र रात्र जागतो.....

मलाच नसते कळत काही,
ही आसवे का अशी ओघळतात,
तुझी आठवण असते की भास,
हे सांगण्या मला ह्रदया पर्यंत पळतात.....

मनाला शांतवण्या साठी मग,
हलकेच मी उशीत विरघळतो,
आकाशीचा चंद्र मात्र तेव्हाच,
चांदणीच्या कुशीत पाघळतो.....

मग कधी तरी तुझी चाहुल लागते,
माझ्या मनाचा कोपरा ही सुखावतो,
लगबगीने तुझ्यासाठी दार उघडताच,
सुर्य किरणांचा तांडा आत डोकावतो.....

तारवटलेल्या डोळ्यांनी समोर बघताच,
भिंतीवरल्या तसबिरीतला तुझा,
हसरा चेहरा मला रोज बघतो,
अरेच्च्या.........
मी विसरुनच जातो कधी,
मी कोणीतरी तुझा लागतो.....
मी कोणीतरी तुझा लागतो.....
नंदू

No comments:

Post a Comment