Sunday, May 22, 2011

तिन्ही सांज

तिच तर वेळ असायची,
तु तुळस पुजायला येण्याची,
न हिच संधी असायची मला,
तुला चोरुन पहाण्याची....

तेव्हाच बहरलेला असायचा प्राजक्त,
गालही तुझे दिसायचे मला आरक्त,
तुझ्या डोळ्यांनाही घाई असायची,
झालेली कुणाला तरी शोधण्याची....

पहिली भेट अन पहिला पाऊस,
तो कधीही विसरुन नको जाऊस,
मला झाला होता येण्यास उशीर,
पण तु त्या पावसातही आतुर,
वाट पहात होतीस माझ्या येण्याची....

किती ही विसरु म्हटलं तरी,
न विसरता येणार्‍या त्या आठवणी,
मला आठवत आहे अजुन ही,
तुझी ती नेहमीची सवय,
मला पाहुन....
लटकेच मानेला झटका देण्याची....

खुप जगलो ते हळवे क्षण,
खुप जागवल्या त्या आठवणी,
मनीची ती हुरहुर कमी होत चाललीय,
कुठेतरी मनाला चाहुल लागतेय,
तु माझ्या पासुन दूर जाण्याची....

आताशा तु ही नाहीस मज जवळ,
आठवणी ही पुसल्यात जवळ जवळ,
आता दिवस कललाय तिन्ही सांजेकडे,
मात्र डोळे वाट पहाताहेत,
कधी तरी अंधार रात्र येण्याची....
नंदू

No comments:

Post a Comment