Sunday, May 22, 2011

लग्न म्हणजे...

लग्न म्हणजे...
दोन अनोळखी जीवांची रेशिमगाठ,
लग्न म्हणजे...
दूरवर एकत्र चालायाची पाऊलवाट,
लग्न म्हणजे...
एकमेकां वरचा सार्थ विश्वास,
लग्न म्हणजे...
एका ह्रदयाने दुसर्‍याला दिलेली आर्त साद,
लग्न म्हणजे...
भावी आयुष्याची पडणारी गोड गुलाबी स्वप्नं,
लग्न म्हणजे..
एकमेकां बद्दलचा आदर आणि प्रेम जोपासणं,
लग्न म्हणजे...
सागराने सरीतेला दिलेली बेधुंद हाक,
लग्न म्हणजे...
एक दुसर्‍याच्या ह्रदयातल्या भावना जपणं,
लग्न म्हणजे...
अवचित बरसणार्‍या पावसाच्या रेशीम धारा,
लग्न म्हणजे...
मनी फुलणारा मोरपंखी पिसारा,
लग्न म्हणजे...
ऐन वसंतात आलेला प्रेमाचा बहर,
लग्न म्हणजे...
आयुष्यभर सांभाळायचा काचेचा डोलारा,

असे हे दोन जीवांना एकत्र आणणारे "लग्न"
ते दोघे ही एकमेकांच्या सानिध्यात असतात मग्न,
पण विश्वास आणि आदर नसेल जर त्यांच्यात,
तर हे गुलाबी स्वप्नं क्षणार्धात होते "भग्न"........


नंदू

1 comment: