Sunday, May 22, 2011

कल्लोळ

क्षणभराचाच तुझा तो स्पर्श,
आय़ुष्यभर विरहाची,
आठवण करुन देतो,
त्या विरहातही तुझ्या आठवाने,
क्षणभरच का होईना,
मी हरखुन जातो....

शांत निवांत नदीकाठी,
कडे कपार्‍यांचे सौंदर्य पहात,
एकटाच मी तल्लीन असतो,
माझ्या ही नकळत,
केव्हा कुणास ठाऊक,
समय कसा सरकुन जातो....

अन अचानक हवेची,
एक हलकिशी झुळुक,
तुझ्या येण्याची चाहुल देऊन जाते,
मन तुझ्या आठवणीतुन,
बाहेर येत असतानाच,
तुझा पायरव कानाजवळ,
हळुवार थिरकुन जातो....

विरह तुझा जीवघेणा,
एकांतातही बिलगुन आहे,
ह्रदयापाशी तुझ्या वेदनांचा,
कल्लोळ धडकुन जातो....

नंदू

No comments:

Post a Comment