Sunday, May 22, 2011

तुच केलास ना हट्ट

मी नव्हतोच तसा राजी,
तुच केला होतास ना हट्ट,
बेधुंद कोसळणार्‍या पावसात,
जेव्हा तुझी मिठी पडली होती घट्ट....

तोच कोसळणारा बेधुंद पाऊस,
साथीला बेभान वहाणारा वारा,
त्या चांदण्या रात्रीत ही दिसत होतं,
मला तुझ्या चेहर्‍यावरचं मादक हासु स्पष्ट.....

चंद्र ही चिडवत होता चांदणीला,
झाडानं ही कवटाळलं होतं वेलीला,
अशा चांदण्या रात्रीत ती बेहोष चांदणी,
चंद्रावर झाली होती काहीशी रुष्ट.......

सागर ही बेभान,
धरीत्रीला कवेत घेण्या,
भ्रमर ही बेताल,
फुलातला मध चाखण्या,
असा हा निसर्गाच्या,
खेळातला मिष्किल हट्ट,
पहात ओलेती मनं आपुली,
झाली अधिकच घट्ट......








नंदू

No comments:

Post a Comment