Monday, February 14, 2011

कधी कधी असही.......

कधी कधी असंही जगावं लागतं....!
खोट्या चेहर्‍या पलीकडे,
खरं दुखः लपवावं लागतं,
कर्तव्याच्या नावाखाली,
स्वतःला गुंतवावं लागतं......

कधी कधी असंही जगावं लागतं....!
दुसर्‍याच्या डोळ्यातला,
आनंद जपण्यासाठी,
आपल्या डोळ्यांतील पाणी,
लपवावं लागतं....
खुप प्रेम असुन देखील,
निर्विकार बनावं लागतं.....

कधी कधी असंही जगावं लागतं....!
इतरांना हसवता हसवता,
ह्रदयातल्या दुखःला गोंजारावं लागतं,
अव्यक्त प्रेमासाठी देखील,
भावना हीन व्हावं लागतं.......

कधी कधी असंही जगावं लागतं....!
चंद्राच्या शितल सावली साठी,
सुर्याचं प्रखर तेज सोसावं लागतं,
सोज्वळ,निर्मळ सरीते साठी,
सागराच्या महाकाय लाटांना,
अंगावर झेलावं लागतं.......

कधी कधी असंही जगावं लागतं....!
शालीन प्रेमा साठी,
पहाड व्हावं लागतं,
जीवघेण्या संकटांना,
सामोरं जावं लागतं,
तीव्र ईच्छा असुन देखील,
अनिच्छेनेच नाही म्हणावं लागतं.....

खुपदा असंही जगावं लागतं....!
ह्रदय विदिर्ण असलं तरी,
ओठांवर हासु ठेवावं लागतं,
मागे वळुन न पाहाता,
अनोळखी वाटेवरुन,
अनभिज्ञा सम चालावं लागतं.....

पुन्हा कधीही न परतण्या साठी...
पुन्हा कधीही जीव न लावण्या साठी.....
भग्न ह्रदय पुन्हा कधीही न जोडण्या साठी....

  नंदू

1 comment:

  1. तू आणि मी दोन समांतर रेषा

    कधी न मिळणाऱ्या, पण एकत्र चालणाऱ्या

    असेच एक नाते युगायुगाचे !!!

    ReplyDelete